7 नोव्हेंबर रोजी खेळल्या गेलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 39 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अतिशय रोमांचक विजय नोंदवला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना इब्राहिम झद्रानच्या शानदार शतकाच्या बळावर 50 षटकांत 5 विकेट्स गमावून 291 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 7 विकेट्स गमावून 293 धावा केल्या आणि 47 व्या षटकातच हे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा नायक ग्लेन मॅक्सवेल होता, ज्याने आपल्या संघासाठी नाबाद द्विशतक झळकावले आणि पराभूत होण्याच्या स्थितीतून विजयापर्यंत नेहून पोहचवले.
अफगाणिस्ताननी दिलेल्या या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने एकामागून एक सात विकेट्स गमावल्या आणि धावसंख्या अवघी 91 होती. अशा स्थितीत 6व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) शेवटची आशा होती. मॅक्सवेलने आर या पार खेळी खेळली आणि यादरम्यान त्याला वैयक्तिक 33 धावा असताना मोठे जीवदान मिळाले.
मॅक्सवेलने या सामन्यात 47वे षटक टाकणाऱ्या मुजीब उर रहमान (Mujeeb Ur Rahman) याला 4 चेंडूत 22 धावा ठोकत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या षटकात पहिल्या चेंडूवर कोणतीही धाव आली नाही परंतु दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर चौकार आणि पाचव्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात मुजीब उर रहमान याने मॅक्सवेलचा एक झेलही सोडला. तर गोलंदाजी करताना 8.5 षटकात 72 धावा दिल्या.
Last 4 balls of Maxwell’s innings 🔥🔥 pic.twitter.com/80I9diF5gx
— Cricketopia (@CricketopiaCom) November 8, 2023
ऑस्ट्रेलिया संघाचा हा विश्वचषक 2023 मधील सहावा विजय आहे. सहा विजयांसह गुणतालिकेत ते आता तिसऱ्या स्थानी विराजमान झाले आहेत, तसेच त्यांनी विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीतही स्थान मिळवले आहे. (22 runs in 4 balls to the one who dropped the catch, see what really happened)
म्हत्वाच्या बातम्या
अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलने घातला राडा, नक्की काय घडलं वाचाच
एकच फाईट वातावरण टाईट! मॅड मॅक्सने 201 धावा करताच बनले 5 World Record, मोडणे खूपच कठीण