---Advertisement---

टीम इंडियाशिवाय अजूनही दोन संघांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले २ क्रिकेटपटू

---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात खूप कमी असे क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी एकापेक्षा अधिक संघांकडून प्रतिनिधित्व केले आहे. भारताचे ९ क्रिकेटपटू आहेत ज्यांनी भारतीय संघाव्यतिरिक्त इतर संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. आशिया एकादश आणि आयसीसी विश्व एकादशकडून प्रतिनिधित्व केल्याने भारतीय खेळाडूंचं या यादीत नाव सामील झाले आहे.

भारताकडून सौरव गांगुली, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, अनिल कुंबळे, युवराज सिंग, झहीर खान, हरभजन सिंग, आणि आशिष नेहरा या खेळाडूंनी भारतीय संघाव्यतिरिक्त आशिया एकादशकडून आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला आहे.

या ९ खेळाडूंपैकी फक्त दोन असे खेळाडू आहेत, ज्यांनी आशिया इलेव्हन सोबतच आयसीसी विश्व एकादशकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.

या लेखात आपण त्या दोन खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी भारतासहित ३ संघांकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.

भारतासहित ३ संघांकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळणारे २ खेळाडू- २ Cricketers who played for other countries including India

राहुल द्रविड (भारत / आशिया एकादश/ आयसीसी विश्व एकादश)

भारतीय संघाचा महान फलंदाज राहुल द्रविडने (Rahul Dravid) भारताव्यतिरिक्त आशिया एकादश आणि आयसीसी विश्व एकादश संघाचं आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. द्रविडने कसोटी कारकिर्दीत १६४ सामने खेळले आहेत. त्यात ३६ शतके आणि ६३ अर्धशतकांच्या मदतीने १३२८८ धावा बनवल्या आहेत. या १६४ कसोटींपैकी एक कसोटी सामना द्रविडने आयसीसी विश्व एकादश या संघाकडून २००५ साली ऑस्ट्रेलियाविरुध्द खेळला. ज्यात द्रविडला पहिल्या डावात खाते उघडायला अपयश आले. दुसऱ्या डावात तो फक्त २३ धावाच करू शकला.

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्दीत द्रविडने ३४४ सामने खेळले आहेत. यात १२ शतके आणि ८३ अर्धशतकांच्या मदतीने १०८८९ धावा केल्या. या ३४४ सामन्यांपैकी १ सामना द्रविडने २००५ साली आशिया एकादश संघाकडून आयसीसी विश्व एकादश संघाविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात द्रविडने नाबाद ७५ धावांची खेळी केली होती. तीन सामने आयसीसी विश्व एकादशकडूनही खेळले आहेत. त्यात ३ सामने मिळून फक्त ४६ धावाच करू शकला, २६ धावा ही सर्वोच्च धावसंख्या होती.
स्कॉटलंडकडून द्रविडने २००३ साली १२ सामने खेळले होते. पण या सामन्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा नव्हता.

विरेंद्र सेहवाग (भारत/ आशिया एकादश/ आयसीसी विश्व एकादश)

भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर आणि विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने भारतासहित अन्य दोन संघांकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सेहवागने कारकिर्दीत १०४ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने २३ शतके आणि ३२ अर्धशतकांच्या मदतीने ८५८६ धावा नावावर जमवल्या. सेहवागने या १०४ सामन्यांपैकी एका सामना आयसीसी विश्व एकादशकडून २००५ साली ऑस्ट्रेलियाविरुध्द खेळला होता. सेहवागने या सामन्यात पहिल्या डावात ७६ आणि दुसऱ्या डावात फक्त ७ धावा करू शकला.

वनडे कारकिर्दीत सेहवागने २५१ सामने खेळले आहेत. यात त्याने १५ शतक आणि ३८ अर्धशतकांच्या ८२७३ धावा केल्या. सेहवागने २५१ सामन्यांपैकी ७ सामने आशिया एकादशकडून खेळले आहेत. या ७ सामन्यांमध्ये सेहवागने एका अर्धशतकाच्या मदतीने २१४ धावा बनवल्या. यात ५२ धावा सर्वोच्च धावसंख्या होती.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---