fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भारताचे दिग्गज क्रिकेटपटू व त्यांनी सुरु केलेली अलिशान हाॅटेल्स

Cricketers who entered the hospitality business

भारत हा असा एक देश आहे जिथे लोक क्रिकेटपटू, राजकारणी व बाॅलीवुड सेलिब्रेटींचे मोठ्या प्रमाणावर चाहते असतात. क्रिकेटपटू हे केवळ देशात नाहीतर तर जगभरात चाहत्यांची मने जिंकतं असतात.

जे क्रिकेटपटू बिजनेस बाबतीत हुशार असतात ते कारकिर्द संपण्यापुर्वीच क्रिकेटमधून आलेला पैसा इतर उद्योगधंद्यात गुंतवतात. यात हाॅटले किंवा रेस्टॉरंट्स (रेस्त्रॉं) ही एक चांगली गुंतवणुक म्हणून क्रिकेटपटू पाहतात. Indian Cricketers And The Luxurious Hotels Owned By Them

अन्न, वस्त्र व निवारा यातील महत्त्वाची गरज असलेली एक गोष्ट अर्थात अन्न. या गोष्टीवर क्रिकेटपटूंनी चांगला पैसा गुंतवला आहे. या लेखात आपण अशाच क्रिकेटपटूंची माहिती घेणार आहोत ज्यांनी हाॅटले किंवा रेस्टॉरंट्स (रेस्त्रॉं) सुरु केले आहेत.Cricketers who entered the hospitality business.

१०. सचिन तेंडूलकर

भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वात पहिल्यांदा जर कुणी हाॅटेल सुरु केल्याची चर्चा झाली असेल तर ती अर्थातच भारतीय संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची. त्याने २००२साली मुंबई शहरात कुलाबा येथे ‘तेंडूलकर्ज’ या नावाने पहिले रेस्टॉरंट्स (रेस्त्रॉं) सुरु केले. संजय नारंग या मोठ्या हाॅटेेल व्यावसासियाबरोबर त्याने हे सुरु केले. त्यानंतर सचिनने ‘सचिन्ज’ हे दुसरे रेस्टॉरंट्स (रेस्त्रॉं) उत्तर मुंबईत व बेंगलुरु शहरात सुरु केले. क्रिकेटमध्ये मोठे यश मिळवलेल्या सचिनला या क्षेत्रात अपेक्षित यश मिळाले नाही. तो पुन्हा या क्षेत्रात गांभिर्याने येण्याचा विचार करत आहे. 

९. सौरव गांगुली

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने २००४मध्ये सचिनप्रमाणेच कोलकाता शहरात सौरव्ज हे रेस्टॉरंट्स (रेस्त्रॉं) सुरु केले. परंतु तो रेस्टॉरंट्स (रेस्त्रॉं) केवळ ७ वर्ष चालवु शकला. या रेस्टॉरंट्स (रेस्त्रॉं)ला चार मजले होते. त्यात अनेक रेस्टॉरंट्स (रेस्त्रॉं) व बारचा समावेश होता. २००६मध्ये त्याने सुरु केलेल्या या हाॅटेलचा तो एकटाच मालक होता. सौरव व मला अजिबात वेळ नसल्याने आम्ही ते बंद करण्याचा निर्णय घेतला, असे २०११मध्ये स्नेहाशिष गांगुलीने म्हटले होते. 

८. विरेंद्र सेहवाग

भारतीय संघाचा माजी कर्णधार व स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने सचिनप्रमाणेच या क्षेत्रात नशिब आजमावले. सेहवाग्ज फेवरिट नावाने त्याने दिल्लीत फक्त शाकाहारी लोकांसाठी रेस्टॉरंट्स (रेस्त्रॉं)ची सुरुवात केली होती. परंतु सेहवागलाही हे रेस्टॉरंट्स (रेस्त्रॉं) पुढे चालवता आले नाही व त्याने हे त्याच्या भागीदाराला विकले. 

७. झहिर खान

आपल्या समकालीन क्रिकेटपटूंप्रमाणेच झहिर खाननेही या क्षेत्रात नशीब आजमावले. यात त्याला यशही मिळाले. २००४-०५मध्ये झहिरने झेडकेज हे पुण्यात रेस्टॉरंट्स (रेस्त्रॉं) केले. यात त्याने काॅर्पोरेट इव्हेंटसाठीही वेगळे हाॅल केले. त्यानंतर त्याने २०१३मध्ये टाॅस या नावाने लाॅंजही सुरु केला. याच्या उद्घाटनासाठी राॅय़ल चॅलेंजर बेंगलोर संघातील अनेक खेळाडू उपस्थित होते. या व्यवसायाबद्दल तो सांगतो की, “दुखापतींनी मला विचार करायला भाग पाडलं आणि मी या व्यवसायात आलो. नक्कीच क्रिकेट हेच माझ्यासाठी पहिले प्राधान्य आहे आणि पुढेही क्रिकेटलाच प्राधान्य राहील पण मी माझी एक टीम तयार केली आणि गोष्टी आपोआप चांगल्या गोष्टी घडायला लागल्या. मी व्यवसायातल्या काही गोष्टी लवकर शिकलो.”

६.रवींद्र जडेजा
भारताचा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजानेही या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्याने १२ डिसेंबर २०१२ ला त्याचे पहिले हॉटेल सुरु केले. त्याने ‘जड्डूज् फूड फिल्ड’ या नावाने हॉटेल सुरु केले. १२ हा त्याचा लकी क्रमांक असल्याने त्याने १२ डिसेंबर २०१२ ला सुरु केले. त्याचा जर्सी क्रमांकही १२ आहे. त्याचे हॉटेल राजकोट शहरात असून त्याची बहीण नैना याचे संपूर्ण व्यवस्थापन पाहते. ७ ऑक्टोबर २०१७ रोजी त्याच्या या हॉटेलवर राजकोट महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने छापा टाकला होता. त्यात न खाण्यायोग्य अनेक पदार्थ मिळाले होते.

५. माहेला जयवर्धने व कुमार संगकारा

जगभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीलंकेच्या माहेला जयवर्धने व कुमार संगकाराने हाॅटेल व्यवसायातही आपली भागीदारी कायम ठेवली. त्यांनी दर्शन मुनिष या शेफबरोबर भागीदारीत मिनिस्ट्री ऑफ क्रॅब हे कोलंबो येथे रेस्टॉरंट्स (रेस्त्रॉं) सुरु केले. यात त्यांनी सी फुडला प्राधान्य दिले. या रेस्टॉरंट्स (रेस्त्रॉं)ची अतिशय सुंदर अशी वेबसाईट आहे. यानंतर त्यांनी या हाॅटेलची साखळी मुंबई, शाघांय, मॅनिला, मालदिव्ज व बॅकाॅंक येथे सुरु केली. 

४. अजय जडेजा

भारतीय संघाचा माजी फलंदाज व राजघऱाण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेल्या अजय जडेजाने २००२मध्ये इटालियन रेस्टॉरंट्स (रेस्त्रॉं) सुरु केले. त्याचे नाव सेंसो असे होते. हे हाॅटेल त्याने दिल्ली शहरात सुरु केले होते. यात रेस्टॉरंट्स (रेस्त्रॉं) मध्ये लाल बहादुर शास्त्रींचे नातु दिवाकर शास्त्री यांनीही पैसा गुंतविल्याची तेव्हा चर्चा होती. हे रेस्टॉरंट्स (रेस्त्रॉं) लोकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरले व जडेजाने पुन्हा आपल्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. 

३. कपिल देव

एक उत्तम खेळाडू ते उत्तम कर्णधार ते एक उत्तम बिझनेसमन अशी कपिल देवची ओळख. १९८३मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या या कर्णधाराने १९८०च्या दशकात चंदीगढ येथे हाॅटेल कपिल नावाने हाॅटेल सुरु केले. यालाच कॅप्टन्ज रिट्रीट असेही म्हणून ओळखले जाते. हे हाॅटेल अजूनही सुरु असून कपिलने याचबरोबर अनेक क्षेत्रात गुंतवणुक केली.

२. श्रीशांत व राॅबीन उथप्पा

२००७मध्ये भारताने टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर श्रीशांत व राॅबीन उथप्पा यांनी बॅट एंड बाॅल इन नावाने बेंगलोर शहरात लाॅजिंग व कॅफे सुरु केले. यात त्यांनी केरळचा माजी क्रिकेटपटू जेके महिंद्राला भागीदार घेतले. परंतु यातही बाकी क्रिकेटपटूंप्रमाणेच त्यांनाही अपयश आहे.

१. विराट कोहली

आपल्या सिनीयरच्या पावलावर पाऊल ठेवतं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिल्ली शहरात २०१७मध्ये Nueva नावाने हाॅटेल सुरु केले. याच्या उद्घाटन प्रसंगी आरसीबी संघातील अनेक सदस्य उपस्थित होते. विराटच्या या हाॅटेलमध्ये दक्षिण अमेरिकेतील तसेच स्पेन, इटली, पोर्तुगाल, फ्रांन्स, जपान व आशियातील फुड मिळणार आहे. हे हाॅटेल आरके पुरम भागात असुन ते या भागातील अतिशय लोकप्रिय हाॅटेल ठरले आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-वनडेत पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे ५ महान गोलंदाज

-जो विक्रम भारताच्या नावावर हवा होता तो आहे पाकिस्तानच्या नावावर

-भारतीय संघातील या खेळाडूमुळेच केदार खेळू शकला एवढे वनडे सामने