वनडे क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाजांनी यश मिळविले आहे. यामध्ये असे अनेक गोलंदाज होऊन गेले ज्यांनी या क्रिकेट प्रकारात खूप विकेट्स घेतल्या आहेत. कोणत्याही क्रिकेट प्रकारात विकेट्स घेणे सोप्पं काम नसते. गोलंदाजाला योग्य लाईन आणि लेंथने चेंडू टाकावा लागतो. याव्यतिरिक्त फलंदाज केव्हा केव्हा तर स्वत:च चूक करून आपली विकेट गमावतात.
गोलंदाजांना काही वेळा विकेट्स घेण्यास खूप मेहनत घ्यावी लागते. परंतु असे अनेक गोलंदाज आहेत. ज्यांनी आपल्या कारकीर्दीतील पहिली विकेट पहिल्याच चेंडूत घेतली होती.
एकूण २६ गोलंदाजांनी कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आहे.
अशाच प्रकारे आज आपण या लेखात असे ५ खेळाडू पाहणार आहोत, ज्यांनी आपल्या वनडे कारकीर्दीच्या पहिल्याच चेंडूत विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. 5 great bowlers who took wickets on the first ball in ODI.
वनडे कारकीर्दीतील पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे खेळाडू-
१. जेफ अर्नोल्ड–
इंग्लंडचे माजी गोलंदाज जेफ अर्नोल्ड (Geoff Arnold) यांंनी आपल्या वनडे कारकीर्दीतील पहिली विकेट ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४ ऑगस्ट १९७२ मध्ये घेतली होती. त्यांंनी ग्रॅमी वॉट्सन यांंना शून्य धावेवर बाद केले होते. हा सामना इंग्लंडने ६ विकेट्सने जिंकला होता.
अर्नोल्ड यांनी केवळ १४ वनडे सामने खेळले. त्यामध्ये त्यांनी १७.८४ च्या सरासरीने केवळ १९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी एका डावात ४ विकेट्स घेण्याचा कारनामा एकदा केला होता.
२. क्लाईव्ह लॉयड-
वेस्ट इंडीजचे माजी फलंदाज क्लाईव्ह लॉयड (Clive Lloyd) यांनी १९७३मध्ये इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात पहिली विकेट घेतली होती. ही विकेट त्यांनी आपल्या षटकातील पहिल्याच चेंडूत घेतली होती.
लॉयड हे फलंदाज होते. परंतु ते गोलंदाजीही करत असत. त्यांनी एकूण ८७ वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी ३९.५४ च्या सरासरीने १९७७ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना त्यांनी २६.२५ च्या सरासरीने केवळ ८ विकेट्सच घेतल्या आहेत.
३. शाहिद महबूब-
पाकिस्तानचे माजी गोलंदाज शाहिद महबूब (Shahid Mahboob) यांनी १९८२मध्ये भारताविरुद्धच्या वनडे सामन्यात पहिली विकेट घेण्याचा कारनामा केला होता. या पदार्पणाच्या वनडे सामन्यात त्यांनी ५५ धावा देत केवळ एक विकेट घेतली होती. हा सामना भारताने १८ धावांनी विजय मिळविला होता.
त्यांनी आतापर्यंत केवळ १० वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी ५४.५७ च्या सरासरीने केवळ ७ विकेट्स घेतल्या आहेत.
४. शेन थॉमसन-
न्यूझीलंडचा माजी गोलंदाज शेन थॉमसनने (Shane Thomson) १९९०मध्ये भारताविरुद्धच्या वनडे सामन्यात आपल्या कारकीर्दीतील पहिली विकेट घेतली होती. या सामन्यात त्याने एकूण ३ विकेट्स घेतल्या. यामध्ये पहिली विकेट भारतीय संघाचा फलंदाज मोहम्मद अझरूद्दीनची घेतली होते. यानंतर सचिन तेंडुलकर आणि अजय शर्मा यांची विकेट घेतली होती.
थॉमसनने एकूण ५६ वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ३८.१४ च्या सरासरीने ४२ विकेट्स घेतल्या आहेत.
५. इंझमाम उल हक-
पाकिस्तानचा फलंदाज इंझमाम उल हकने (Inzamam Ul Haq) १९९१मध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे सामन्यात आपल्या कारकीर्दीतील पहिली विकेट घेतली होती. या सामन्यात त्याने ब्रायन लाराला आपले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी केवळ ५ धावांची आवश्यकता असताना बाद केले होते.
इंझमाम हा फलंदाज आहे. परंतु त्याने आपल्या कारकीर्दीत एकूण ३७८ वनडे सामने खेळताना केवळ ३ विकेट्स घेतल्या आहेत.
६.सदागोपन रमेश (वनडे, ५ सप्टेंबर १९९९)
सलामीवीर सदागोपन रमेश यांनी वनडे व कसोटीत १९ कसोटी व २४ वनडे सामने खेळले. २४ वनडेपैकी त्यांना १५व्या वनडेत पहिल्यांदा गोलंदाजी देण्यात आली व त्यातील पहिल्याच चेंडूवर त्यांनी निक्सन मॅक्लेन या वेस्ट इंडिजच्या खेळाडूला तंबूत पाठवले. जरी पदार्पणात नसली तरी सदागोपन रमेश यांनी वनडे कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली.
७. भुवनेश्वर कुमार (वनडे, ३० डिसेंबर २०१२)
पाकिस्तान संघ भारत दौऱ्यावर आला असताना चेन्नईमध्ये ३० डिसेंबर २०१२ रोजी भुवनेश्वर कुमारने वनडे पदार्पण केले. तत्पुर्वी २५ ऑगस्ट २०१२ रोजी त्याने टी२० पदार्पण केले होते. चेन्नई वनडेत भुवनेश्वरने भारताकडून गोलंदाजीसाठी येत पहिल्याच चेंडूवर मोहम्मद हफिजला त्रिफळाचीत केले. याबरोबर वनडे पदार्पणात भारताकडून पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा तो पहिला व एकमेव गोलंदाज ठरला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-जो विक्रम भारताच्या नावावर हवा होता तो आहे पाकिस्तानच्या नावावर
-भारतीय संघातील या खेळाडूमुळेच केदार खेळू शकला एवढे वनडे सामने
-असे एक कारण ज्यामुळे धोनीचा टी२० विश्वचषकातील कमबॅक जवळपास अवघड