क्रिकेटचा सध्या सुवर्णकाळ सुरु आहे. खेळाडू या खेळातून अमाप पैसा कमवत आहेत. क्रिकेटमधून मिळणारे मानधन, ब्रॅंडच्या जाहीराती, सोशल मिडीया, अॅकॅडमी, वेगवेगळे करार तसेच इव्हेंट्समधून क्रिकेटपटू जोरदार पैसा कमावत आहेत.
पुर्वी क्रिकेटपटूकडे साधी मारुती ८०० असेल तरी तिची चर्चा होतं असे. किंवा मालिकावीर म्हणून मिळालेल्या गाडीचीही जोरदार चर्चा होतं असे. १९८९ साली सचिन तेंडूलकरने मारुती ८०० ही गाडी विकत घेतली होती. 7 Fancy Cars Owned By The Biggest Cricket Stars In India.
या लेखात ५ भारतीय खेळाडू व त्यांच्या अलिशान गाड्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
५. कपिल देव
भारतीय संघाचा माजी विश्वविजेता कर्णधार कपिल देव हा क्रिकेट सोडून एक चांगला उद्योजक म्हणून जगाला माहित आहे. कपिलने क्रिकेटमधून मिळालेल्या पैशांचा अतिशय चांगला उपयोग करत हाॅटेेल व अन्य व्यवसायात उभे केले व त्यात तो यशस्वीही झाला. रांगडा खेळाडू म्हणून ओळखल्या गेलेला कपिल स्वत:च्या हिंमतीवर अतिशय अलिशान जिवन जगत आहे. Porsche Panamera diesel व Porsche Panamera premium sedan या दोन अलिशान गाड्या कपिलकडे आहेत. या गाडीचे अगदी स्वस्तातील माॅडेल देखील १ कोटी १९ लाखांच्या खाली नाही. तर सर्वात महागडे माॅडेल हे २ कोटी रुपयांना मिळते. ५.६ सेकंदात ही गाडी १००चा वेग घेते.
४. सचिन तेंडूलकर
भारतीय संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आपली पहिली कार १९८९ साली मारुती ८००च्या रुपात घेतली होती. ही गाडी सचिनला आजही आवडते. याशिवाय सचिनकडे अनेक गाड्या आहेत. तसेच सचिन वेगाचाही शौकिन आहे. तो बीएमडब्लुचा भारतातील ब्रॅंड एँबेसिडरही राहिला आहे.
सचिनला फाॅर्मुला वनचा महान खेळाडू मायकेल शुमाकरने फरारी ही गाडी भेट दिली होती. याशिवाय सचिनकडे BMW i8 ही अलिशान गाडी आहे. तसेच BMW M5, Nissan GT-R Egoist, BMW 7-Series 750 Li, BMW M5 30 Jahre Edition आणि BMW M6 Gran Coupe या गाड्याही सचिनच्या गॅऱजेला आहेत.
३. एमएस धोनी
जगात अनेक क्रिकेटपटू झाले तर काही खेळत आहे. परंतु बाईक व गाड्या यांना घेऊन सर्वाधिक चर्चा जर कुणाची जर होतं असेल तर ती अर्थातच भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीची. धोनीच्या गॅरेजमध्ये अनेक बाईक्स व कार आहेत. २००९मध्ये धोनीने Hummer H2 ही गाडी विकत घेतली. Audi Q7, Mitsubishi Pajero SFX, Land Rover Freelander 2, Mahindra Scorpio, Ferrari 599 GTO, Porsche 911 आणि Toyota Corolla या गाड्या धोनीच्या गॅरेजला आहेत.
२. रोहित शर्मा
भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माही गाड्यांचा शौकीन आहे. आपला मुंबईकर माजी संघसहकारी व महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरप्रमाणेच त्याने २०१५मध्ये अलिशान गाडी खरेदी केली. त्याच्याकडे Mercedes Benz M5, BMW M5, BMW X3, Toyota Fortuner आणि Skoda Laura या गाड्या आहेत.
१. विराट कोहली
भारतीय संघाचा स्टार कर्णधार विराट कोहली हा देखील गाड्यांचा मोठा शौकिन आहे. त्याच्याकडे पिवळ्या रंगाची अलिशान Audi R8 V10 ही गाडी आहे. याचबरोबर Audi R8 LMX, Audi A8 LW12, Audi R8 V10 Plus, Audi Q7, Audi S6, and Audi S5, Audi S6, Toyota Fortuner, Land Rover Range Rover Vogue and Renault Duster या गाड्याही विराटकडे आहेत.