इंडियन प्रीमियर लीगमध्ये मोठी रक्कम देऊन स्टार परदेशी क्रिकेटपटूंना संघात स्थान देणे संघमालकाची पहिली पसंत असते. परंतु या आयपीएल हंगामात कोट्यावधी रुपये खर्चून खरेदी केलेले काही परदेशी क्रिकेटपटू एकही सामना खेळू शकले नाहीत.
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर ख्रिस लिनव्यतिरिक्त नेपाळचा फिरकीपटू संदीप लामिच्चने, वेस्ट इंडिजचा केमो पॉल, न्यूझीलंडचा मिशेल मॅक्लेनेघन, वेस्ट इंडिजचा ओसाने थॉमस, ऑस्ट्रेलियाचा बिली स्टॅनलेक यांच्यासह एकूण 10 परदेशी क्रिकेटपटू या आयपीएलमध्ये बाकावरच बसले होते.
मागील दोन आयपीएल हंगामात ख्रिस लिनने 135 च्या स्ट्राईक रेटने 896 धावा केल्या होत्या. मुंबईने त्याला 2 कोटी रुपये देऊन विकत घेतले होते. मात्र त्याला या हंगामात एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. या निर्णयामुळे चाहत्यांना आश्चर्यच वाटलं.
दिल्लीने दोन स्टार परदेशी खेळाडूंना दिली नाही संधी
गेल्या आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीने नेपाळचा फिरकीपटू संदीप लामिच्चने याने माजी दिग्गज शेन वॉर्न यालाही प्रभावित केले होते. परंतु या हंगामात त्याला दिल्ली कॅपिटल्सकडून एकही सामना खेळता आला नाही. या हंगामात दिल्लीचा फिरकीपटू अमित मिश्रा जखमी झाला, तेव्हा संदीपला संधी मिळेल याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र असे झाले नाही. 20 लाखात विकत घेतलेल्या संदीपने गेल्या आयपीएल हंगामामध्ये सहा सामन्यांत आठ गडी बाद केले होते.
दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू किमो पॉलने मागील आयपीएलमधील आठ सामन्यांत नऊ गडी बाद केले. पण 50 लाखात विकत घेतलेल्या पॉलला या हंगामात एक सामनाही खेळता आला नाही.
मुंबई इंडियन्सने सर्वाधिक तीन परदेशी खेळाडूंना संघात दिले नाही अंतिम ११ जणांच्या संघामध्ये स्थान
या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने तीन परदेशी खेळाडूंना अंतिम ११ जणांच्या संघात स्थान दिले नाही. गेल्या तीन आयपीएलमध्ये कहर करणाऱ्या ख्रिस लिन व्यतिरिक्त, दिल्ली संघाकडून दोन कोटींमध्ये विकत घेतलेला वेस्ट इंडीजचा अष्टपैलू शेफरन रुदरफोर्ड आयपीएलमध्ये एकही सामना खेळू शकला नाही. त्याने मागील हंगामात दिल्लीसाठी सात सामने खेळले होते.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मिशेल मॅक्लेनेघन हा सन 2012 पासून मुंबईचा मुख्य गोलंदाज आहे, पण 1 कोटी रुपयात विकत घेतलेल्या मिशेलला यावेळी खेळण्याची संधीच मिळाली नाही.
सनरायझर्स हैदराबादने दोन परदेशीं खेळाडूंना दिली नाही संधी
सनरायझर्स हैदराबादने वेस्ट इंडीजचा फिरकीपटू फॅबियन ऍलन आणि ऑस्ट्रेलियाचा मध्यमगती वेगवान गोलंदाज बिली स्टॅनलेक यांना एकाही सामन्यात संधी दिली नाही. या दोघांचीही किंमत 50 लाख रुपये होती.
ओसाने थॉमसला 1.10 कोटी रुपयात विकत घेऊनही राजस्थानने दिली नाही संधी
राजस्थान रॉयल्सने वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज ओसाने थॉमसला 1.10 कोटी रुपयांत विकत घेतले पण या हंगामात एकाही सामन्यात त्याला प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान दिले नाही.
कोलकाताने टिम सेफर्टला दिली नाही संधी
केकेआरने न्यूझीलंडच्या टिम सेफर्टला 50 लाखांत विकत घेतले होते, परंतु प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघ व्यवस्थापनाचा आत्मविश्वास त्याला जिंकता आला नाही.
हार्डेस विलजॉनने पंजाबकडून खेळला नाही एकही सामना
गेल्या आयपीएलमध्ये सहा सामन्यांत सात बळी घेणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज हार्डेस विलजॉनने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून एकही सामना खेळला नाही. विलजॉनला 75 लाखात विकत घेतले होते.
सीएसके आणि आरसीबी हे असे दोन संघ होते ज्यांनी त्यांच्या सर्व परदेशी खेळाडूंना किमान एकदा तरी प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान दिले.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्मा आयपीएलमध्ये ‘हा’ भीमपराक्रम करणारा एकमेव खेळाडू
…आणि रोहितने दोन मिनिटात केली सुनील गावसकरांची बोलती बंद
‘हे’ दोन शिलेदार ठरले मुंबईच्या विजयाचे शिल्पकार, रोहित शर्माने दिले श्रेय