ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आज (८मे) आपला २८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म ८ मे १९९३ ला सिडनी येथे झाला होता. त्याने २०११मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
कमिन्सने आतापर्यंत ३४ कसोटी सामने, ६९ वनडे सामने आणि ३० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटीत त्याने २१.५९ च्या सरासरीने एकूण १६४ विकेट्स घेतल्या आहेत. तर वनडेत त्याने २८.७८ च्या सरासरीने एकूण १११ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी२०त त्याने २०.६२ च्या सरसरीने ३७ विकेट्स घेतल्या आहेत.
आज वाढदिवस असणाऱ्या कमिन्सबद्दल माहित नसलेल्या या खास १० गोष्टी- 10 Things to know about Pat Cummins
वयाच्या १८व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण-
कमिन्स सिडनीमध्ये ज्युनियर लेव्हल क्रिकेट खेळले आणि वयाच्या १८ व्या वर्षी न्यू साउथ वेल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तो कोणताही सामान्य मुलांप्रमाणे नव्हता. त्याने त्यावेळी जवळपास १५० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी केली होती. या वयात सर्वाधिक क्रिकेटपटू देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी मेहनत घेत असतात, परंतु या वयात कमिन्स ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी तयार झाला होता.
त्याने केपटाऊन येथे १३ ऑक्टोबर २०११ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी२० सामना खेळला. त्या सामन्यात त्याने अवघ्या ४ षटकात २५ धावा देत ३ विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. त्यानंतर त्याने त्याच महिन्यात १९ तारखेला त्याच संघाविरुद्ध वनडे संघात पदार्पण केले होते.
पदार्पणाच्या कसोटी सामन्यात ७ विकेट्स-
कमिन्सने आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळविला होता. २०११मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात ११७ धावा देत ७ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्याने जवळपास ६ वर्षे कसोटी क्रिकेट खेळले नव्हते. सततची दुखापत ही त्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये नसण्याचे प्रमुख कारण आहे.
जोहान्सबर्ग येथे खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कमिन्सने दक्षिण आफ्रकेची फलंदाजी फळी कमकुवत केली होती. त्याने पहिल्या डावात केवळ १ विकेट घेतली होती. तर दुसऱ्या डावात त्याने ६ विकेट्स पटकाविल्या होत्या. त्याच्या योगदानामुळे तो सामना ऑस्ट्रेलियाने २ विकेट्सने जिंकला होता. त्याच्या दुसर्या डावातील ६ बाद ७९ धावा या कामगिरीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते.
६ वर्षांनंतर कसोटीत पदार्पण-
२७ वर्षीय कमिन्स आताही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रतिष्ठित गोलंदाज आहे. पण, त्याच्या दुखापतीमुळे त्याला बराच काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागले. त्यामुळे तो क्रिकेटमध्ये जास्त झळकू शकला नाही.
कमिन्सने फेब्रुवारी २०१७ला श्रीलंका संघाविरुद्ध मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. तसेच, मार्च २०१७ला भारताविरुद्ध रांची येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातूनही त्याला कसोटीत पुनरागमणाची संधी मिळाली होती. विशेष म्हणजे तब्बल ६ वर्षांनंतर त्याला कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरा कसोटी सामना आणि ६ वर्षांनंतरचा पहिलाच कसोटी सामना असेल.
१५३ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी-
कमिन्स त्या वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे, जे सलग एकाच गतीने वेगवान गोलंदाजी करू शकतात. जेव्हा कमिन्सने ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात प्रवेश केला, तेव्हापासून त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०१५मध्ये सिडनीत झालेल्या विश्वचषकातील सामन्यात कमिन्सने १५३ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी केली होती. या स्पर्धेनंतर त्याने स्वत:चाच विक्रम मोडला.
दुखापतग्रस्त कारकीर्द-
कमिन्स सध्या आपल्या वेळापत्रकामध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व स्वरुपातील पदार्पणाच्या सामन्यात उत्कृष्ट खेळी करूनही आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात कमिन्स तणावामुळे ग्रस्त होता. त्यामुळे त्याच्या राष्ट्रीय संघातील धावांवर परिणाम झाला होता. सुरुवातीला दुखापतींमधून जात असताना तो २०१५मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात झालेल्या कमरेच्या दुखापतीमुळे त्याला १ वर्षासाठी संघातून बाहेर रहावे लागले होते. त्यानंतर जवळपास २० महिन्यांनंतर त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून पुनरागमन केले होते.
सर्वात युवा खेळाडू म्हणून करार-
२०११ मध्ये तो राष्ट्रीय संघाबरोबरच्या करारावर स्वाक्षरी करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता. ऑस्ट्रेलियासारख्या देशासाठी खेळणे ही एक मोठी कामगिरी आहे. तसेच देशासाठी सर्वात कमी वयात टी२० क्रिकेटमधील खेळाडू बनणे हा एक मोठा पराक्रम आहे.
ज्यावेळी कमिन्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण केले, त्यावेळी तो केवळ १८ वर्ष आणि १५८ दिवसांचा होता. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघातील सर्वात युवा खेळाडू बनला होता.
आदर्श – ब्रेट ली
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट ली (Brett Lee) हा जगातील अनेक युवा वेगवान गोलंदाजांचा आदर्श व्यक्ती आहे. सरासरी वेग, सूक्ष्म फरक, फेमस सेलिब्रेशन, उत्तम शिस्त आणि गोलंदाजी करण्याची उत्तम शैली या साऱ्या गोष्टी कमिन्सच्या ब्रेट ली सारख्याच असतात.
ली ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. कमिन्स जेव्हा ६ वर्षांचा होता, तेव्हा लीने क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. लीच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे प्रेरित होण्यासाठी कमिन्सला फार काळ लागला नाही. ली आणि कमिन्स यांनी ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना काही सामने एकत्र खेळले आहेत.
विश्वचषक विजेता-
कमिन्सला २०१५ च्या विश्वचषकात जेवढ्या संधी मिळाल्या तेवढ्याचा फायदा घेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड येथे झाला होता. तेथे त्याने ब्रॅड हॅडिनबरोबर शेवटच्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी रचली आणि दोन विकेट्स घेतल्या.
त्याचा दुसरा सामना स्कॉटलंडविरुद्ध होता. या सामन्यात त्याने होबार्टच्या बेलेराईव्ह ओव्हल येथे स्कॉटलंडने अवघ्या १३० धावाच केल्या होत्या. यामध्ये त्याने ४२ धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या होत्या.
आयपीएल विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघात समावेश –
२०१४च्या आयपीएल लिलावामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने कमिन्सला १ कोटी रुपयांना आपल्या संघात सामील केले होते. याचवर्षी कोलकाताने आयपीएलचे विजेतेपद दुसऱ्यांदा आपल्या नावावर केले होते. त्यामुळे त्याला आयपीएल विजेत्या संघाचा भाग होता आले होते. सध्या पुन्हा एकदा कमिन्सला २०२१ आयपीएलसाठी कोलकाता नाईट रायडर्सने संघात घेतले आहे. त्यांनी त्याला तब्बल १५.५० कोटी रुपये मोजत त्याला संघात घेतले आहे.
आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघाचे प्रतिनिधित्व-
बीबीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर आयपीएल फ्रंचायझी दिल्ली डेअरडेविल्स (आताचा दिल्ली कॅपिटल्स) संघाने त्याला २०१७ मध्ये ४.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा भारतावर आरोप, मॅच फिक्सिंगचा गड आहे भारत
-…तर होऊ शकते आयपीएल २०२० चे आयोजन
-विराट कोहलीसाठी डोकेदुखी ठरलेल्या या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने केली खांद्याची सर्जरी