१. रवी कुमार दहियाच्या वडिलांनाही कुस्तीपटू बनायचे होते. मात्र, आर्थिक संकटांमुळे त्यांना हे स्वप्न पूर्ण करता आले नाही. आता आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलगा रवी ऑलिंपिक पदकावर आपले नाव कोरणार आहे.
२. फ्रीस्टाईल ५७ किलो वजनी गटात लढणारा २३ वर्षीय रवीने जागतिक अंडर २३ चॅम्पियनशिप (२०१८), जागतिक चॅम्पियनशिप (२०१९)आणि एशियन चॅम्पियनशिप (२०२० आणि २०२१) मध्ये पदक जिंकले आहे.
३. रवी भारताच्या हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्याच्या नाहरी गावातील रहिवासी आहे. त्याने तेथील तालमीत कुस्ती सुरू केली होती. याच गावातून भारतासाठी महावीर सिंग आणि अमित दहिया यांनी ऑलिंपिक्स खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
४. भारताची राजधानी दिल्लीमधील छत्रसाल कुस्ती स्टेडिअममध्ये अनेक कुस्तीपटू सराव करतात. हे रवीचे होम ग्राऊंड आहे. तिथे त्याने वयाच्या १० ते ११ वर्षापासून सराव केला आहे.
५. रवीला एक लहान भाऊही आहे. त्याचे नाव पंकज आहे. त्यालाही कुस्तीपटू बनायचे आहे.
६. जर रवी गुरुवारी (५ ऑगस्ट) सुवर्ण पदक आपल्या नावावर करण्यात यशस्वी ठरला, तर तो भारतीय इतिहासात वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा पहिलाच आणि अंतिम सामन्यात पोहोचणारा दुसराच भारतीय खेळाडू असेल. यापूर्वी ऑलिंपिक्समध्ये भारतासाठी नेमबाज अभिनव बिंद्राने सुवर्णपदक जिंकले आहे.
७. भारताने आतापर्यंत कुस्तीमध्ये ४ ऑलिंपिक पदके जिंकलेे आहेत. यानंतर आता रवीचे पदक मिळून पाच पदके होतील.
८. रवीला आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एक गंभीर दुखापतीचा सामना करावा लागला होता. ही दुखापत त्याला राष्ट्रीय चॅम्पियनशिपच्या उपांत्य सामन्यात झाली होती.
९. यावर्षी जुलैमध्ये एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले होते की, कांस्य किंवा रौप्य नाही, तर टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये सुवर्ण पदक मिळवण्याचे लक्ष्य आहे.
१०. रवी दहियाने यापूर्वीही एक जबरदस्त पुनरागमन केले आहे. पोलंडमध्ये आयोजित झालेल्या एका स्पर्धेदरम्यान त्याने ८-० ने पिछाडी मिळाल्यानंतर आपल्या प्रतिस्पर्ध्याला तब्बल १८-८ ने पराभूत केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-चक दे इंडिया! भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, जर्मनीला ५-४ ने पछाडत जिंकले ‘कांस्य’ पदक
-बॉक्सिंगमध्ये देशाला मिळवून दिले पदक, आता महिनाभराची सुट्टी घेणार लवलीना
-शिवपाल सिंगचं फायनलचं तिकीट हुकलं; भालाफेकीत दोन्ही ग्रूपमधील ऍथलिट पार करू शकले नाहीत नीरजचे अंतर