पुणे। ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत देशभरातून 100 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा नटराज टेनिस कोर्ट, कर्वेनगर या ठिकाणी 16 ते 22 एप्रिल 2022 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धा संचालक रिया किर्तने यांनी सांगितले की, स्पर्धेत अहमदाबाद, मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या ठिकाणांहून खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये स्मित उंडरे, राम मगदूम, आर्यन किर्तने, शौर्य गडदे, अनुष्का जोगळेकर, रित्सा कोंडकर, काव्या पांडे या मानांकित खेळाडूंचा सहभाग आहे. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्रक व गुण देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी सेजल केनिया यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत टेनिसनट्स संघाचा सलग दुसरा विजय