अबुधाबी। काल(१९ सप्टेंबर) आयपीएलच्या १३ व्या हंगामातील पहिला सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. हा सामना चेन्नईने ४ चेंडू राखत ५ विकेट्सने जिंकला. या विजयाबरोबरच चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे.
धोनीचा हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार म्हणून १०० वा विजय होता. म्हणजेच चेन्नई सुपर किंग्सने धोनीच्या नेतृत्त्वाखाली १०० विजय मिळवले आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये एकाच संघाकडून कर्णधार म्हणून १०० विजय मिळवणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
धोनीने आत्तापर्यंत १७५ आयपीएल सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. त्यातील १०५ सामन्यात त्याने विजय मिळवला आहे. यातील १०० सामने चेन्नईचे नेतृत्व करताना जिंकले आहेत. तर ५ सामने रायझिंग पुण सुपरजायंट्सचे नेतृत्व करताना जिंकले आहेत. याबरोबरच धोनी हा सर्वाधिक आयपीएल सामन्यात नेतृत्व करणाराही कर्णधार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कोण होणार आयपीएलमधला सर्वात मोठा गेम चेंजर; भारतीय दिग्गजाने सांगितले नाव
पहिल्याच आयपीएल सामन्यात एमएस धोनीच्या नावावर झाला ‘मोठा’ विश्वविक्रम
हिटमॅनचा पराक्रम! पहिल्याच सामन्यात रचला इतिहास, ठरला आयपीएल इतिहातील पहिलाच फलंदाज
ट्रेंडिंग लेख –
मुंबई इंडियन्सच्या फिरकी आक्रमणाचा नवा स्तंभ
युवराजशी फ्लिंटॉफने पंगा घेतला, पण ब्रॉडने किंमत चुकवली
‘उजव्या हाताचा रिषभ पंत’ अशी ओळख असलेला मोहरा आयपीएल गाजवणार