आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 डिसेंबर ही तारीख खूपच खास असल्याचे दिसून येत आहे. कारण याच दिवशी तब्बल 11 बड्या क्रिकेटपटूंचा जन्म झालेला दिसून येतो. आधुनिक क्रिकेटमधील हे सर्व खेळाडू आपापल्या संघासाठी व देशासाठी नेहमीच उत्कृष्ट कामगिरी करताना दिसले. कोण आहेत हे क्रिकेटपटू हे आपण जाणून घेऊया.
नासिर जमशेद-
पाकिस्तानचा माजी सलामीवीर असलेला नासिर जमशेद काही वर्ष पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता. 2008 मध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने पाकिस्तानसाठी 68 सामने खेळले.
करूण नायर-
कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी त्रिशतक ठोकणारा केवळ दुसरा फलंदाज होण्याचा मान करूण नायर याला मिळालेला. तो सध्या भारतीय संघ बाहेर असला तरी, 2016 मध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने भारतासाठी पाच कसोटी सामने खेळले आहेत.
सुयश प्रभुदेसाई-
अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नसली तरी, गोव्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सुयश प्रभुदेसाई याने आयपीएलमधून आपले नाव कमावले आहे. 26 वर्षांचा सुयश आयपीएलमध्ये आरसीबीसाठी खेळताना दिसतो.
शॉन एर्विन-
शॉन एर्विन याने अनेक वर्ष झिम्बाब्वे संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने आपल्या देशासाठी 5 कसोटी व 42 वनडे सामने खेळलेले. त्याचा भाऊ क्रेग एर्विन हा अजूनही झिम्बाब्वे संघाचा सदस्य आहे.
श्रेयस अय्यर-
सध्या भारतीय संघाचा भरवशाचा फलंदाज असलेला श्रेयस अय्यर 29 वर्षांचा होत आहे. भारताच्या तीनही प्रकारच्या संघामध्ये त्याचा समावेश असतो.
हॅरी टेक्टर-
आयर्लंड क्रिकेटचा भविष्यातील कर्णधार म्हणून हॅरी टेक्टर याच्याकडे पाहिले जात आहे. 24 वर्षांच्या टेक्टरने भारताविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
ऍण्ड्रू फ्लिंटॉफ-
क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलूंमध्ये इंग्लंडच्या ऍण्ड्रू फ्लिंटॉफ याची वर्णी लागते. इंग्लंडचे नेतृत्व केलेल्या या खेळाडूने आपल्या देशासाठी 200 पेक्षा जास्त सामने खेळलेले. तो आपला 46 वा वाढदिवस साजरा करत आहे.
ग्लेन फिलिप्स-
न्यूझीलंड संघाचा आक्रमक फलंदाज ग्लेन फिलिप्स हा देखील आपला 27 वा वाढदिवस साजरा करतोय. न्यूझीलंडसाठी आत्तापर्यंत 66 सामने खेळलेल्या फिलिप्सने नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात शानदार शतक झळकावले होते.
रविंद्र जडेजा-
भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजा हा 35 वा वाढदिवस साजरा करतोय. नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकात त्याची भूमिका भारतासाठी महत्वाची राहिली. जडेजा मागच्या काही वर्षांमध्ये जगातील सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक मानला जात आहे.
जसप्रीत बुमराह-
श्रेयस अय्यर व रविंद्र जडेजा या आपल्या संघ सहकाऱ्यांप्रमाणेच भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह हा देखील आपला 30वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक अशी त्याची ख्याती आहे.
आरपी सिंह-
भारताने जिंकलेल्या 2007 टी20 विश्वचषक विजयात आरपी सिंह याचे महत्त्वाचे योगदान होते. त्याने त्या विश्वचषकात सर्वाधिक 12 बळी मिळवलेले. आरपीने भारतासाठी एकूण 84 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. (11 Cricketers Who Born On 6 December)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयचा आणखी एक क्रांतिकारी निर्णय! यंदाच्या रणजी ट्रॉफीत दिसणार कधीही न घडलेली गोष्ट
बीसीसीआयचा आणखी एक क्रांतिकारी निर्णय! यंदाच्या रणजी ट्रॉफीत दिसणार कधीही न घडलेली गोष्ट