---Advertisement---

टोकियो ऑलिंपिकसाठी भारताच्या खेळाडूंचे जाणार इतिहासातील सर्वात मोठे पथक, ‘इतक्या’ महिला आणि पुरुष खेळाडूंचा समावेश

On: बुधवार, जुलै 14, 2021 9:33 PM
---Advertisement---

यंदा 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिकचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा जपानची राजधानी टोकियो येथे आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारताच्या 119 खेळाडूंसह एकूण 228 सदस्यीय पथक जपानची राजधानी टोकियोला पाठवले जाणार आहे. या पथकामध्ये 119 खेळाडूंपैकी 67 पुरुष आणि 52 महिलांचा सहभाग आहे. भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी याबद्दल माहिती दिली आहे. भारतीय खेळाडू एकूण 85 स्पर्धांमध्ये सहभाग घेणार आहे.

टोकियो ऑलिंपिकमध्ये जाणार असलेले भारताच्या खेळाडूंचे हे सर्वात मोठे पथक असणार आहे. यापूर्वी रियो ऑलिंपिक 2016 मध्ये भारताच्या एकूण 118 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. बात्रा पुढे म्हणाले की, ‘टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताचे पहिले पथक 17 जुलैला टोकियोला रवाना होणार आहे. यामध्ये एकूण 90 खेळाडू आणि अधिकारी असणार आहेत.’

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन 23 जुलै पासून ते 8 ऑगस्ट दरम्यान केले आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे स्पर्धेदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना सामने पाहण्याची परवानगी दिलेली नाही. ऑलिंपिकच्या या स्पर्धेचे आयोजन आपत्कालीन उपाययोजनांअंतर्गत केले जाणार आहे. ही आपत्कालीन उपाययोजना 22 ऑगस्टपर्यंत चालेल.

मंगळवारी भारतीय नौकायान पथकाचे चार खेळाडू आणि प्रशिक्षक टोकियो येथे दाखल झाले आहेत. युरोपच्या वेगवेगळ्या देशांमध्ये सराव करणारे नौकायान करणारे खेळाडू त्यांच्या सरावाच्या ठिकाणाहून जपानची राजधानी टोकियोमध्ये पोहोचले आहेत.

हे खेळाडू यूरोपमधून टोकियोमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळेच या खेळाडूंना भारतातून येणाऱ्या खेळाडूंसारखे कोरोनाच्या कडक नियमांचे पालन करावे लागणार नाही. बॉक्सिंग संघ हा इटलीमधून तर नेमबाजी संघ क्रोएशियाहून जपानची राजधानी टोकियो येथे पोहचणार आहेत. वेटलिफ्टर मीराबाई चानू 15 किंवा 16 जुलै रोजी अमेरिकेतून टोकियोला पोहचणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘यशस्वी झाल्यावर मी तुझ्यासोबत आयस्क्रीम खाईल’, स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला मोदींची ऑफर; घ्या जाणून

टोकियो ऑलिंपिकसाठी पीव्ही सिंधू सज्ज, स्पर्धेपूर्वी करुन घेतले खास नेल आर्ट, फोटो व्हायरल

डेव्हिड भाऊ जोरात! वॉर्नरने आता थेट अक्षय कुमारची केली नक्कल; म्हणाला, ‘सर्वात भारी कोणी केलंय?’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---