महिला आयपीएलचे छोटे स्वरूप म्हटले जाऊ शकते अशी स्पर्धा म्हणजे महिला टी-२० चॅलेंज होय. ही स्पर्धा २३ मे पासून पुण्यामध्ये सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमामे यावर्षी देखील या टी-२० लीगमध्ये तीन संघ सहभाग घेणार आहेत आणि चार सामने खेळले जातील. यावर्षी या टी-२० चॅलेंजमध्ये एकूण १२ विदेशी महिला खेळाडू सहभाग घेतील अशी माहिती मिळाली आहे. यामध्ये इंग्लंडची कर्णधार हिथर नाइट, उत्कृष्ट वेगवान गोलंदाज सोफी एक्लेस्टन आणि ऑस्ट्रेलियाची एलेना किंग यांचाही समावेश आहे.
बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, एकूण १२ विदेशी महिला खेळाडू टी-२० चॅलेंजमध्ये सहभाग घेण्यासाठी भारतात येणार आहेत. २३ मे रोजी सुरू होणारी या टी-२० चॅलेंजचा अंतिम सामना २८ मे रोजी खेळला जाणार आहे. लीगचे सर्वच्या सर्व चार सामने हे पुण्यामध्ये खेळले जातील. नुकत्याच न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या एलेना किंगने उत्कृष्ट प्रदर्शन करून सर्वांना प्रभावित केले होते. एलेना ऑस्ट्रेलियाची एकमात्र खेळाडू आहे, जी या टी-२० लीगमध्ये सहभाग घेणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
इंग्लंडची कर्णधार हिथर नाइट आणि सोफी एक्लेस्टोन यांच्या व्यतिरिक्त सोफिया डंकले आणि डॅनी वॉट या इंग्लंडच्या खेळाडू देखील स्पर्धेत सहभाग होणार आहेत. दक्षिण आफ्रिका संघाची फलंदाज लॉरा वॉलवार्ट आणि मारिजने केप या देखील स्पर्धेत खेळताना दिसतील. वेस्ट इंडिजची डिएंड्रा डोटिन आणि हेली मॅथ्यूजही या टी-२० लीगमध्ये खेळण्यासाठी भारतात दाखल होणार आहेत.
मागच्या वर्षी या स्पर्धेचे आयोजिन होऊ शकले नव्हते आणि भविष्यात देखील ही टी-२० लीग पुन्हा आयोजित केली जाण्याची शक्यता खूप कमी आहे. यावर्षीची महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा संपन्न झाल्यानंतर बीसीसीआय या लीगचा पुढचा हंगाम आयोजित करेल असे चित्र सध्या तरी दिसत नाहीये. कारण, बीसीसीआय पुढच्या वर्षीपासून पुरुषांच्या आयपीएलप्रमाणेच महिला आयपीएलचे आयोजन करण्याची शक्यता आहे. महिला आयपीएलविषयी मागच्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. अशात आता बीसीसीआयकडून चाहत्यांची आणि खेळाडूंची ही इच्छा प्रत्यक्षात उतरवली जाऊ शकते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताविरुद्ध १० विकेट्स घेताना घातलेल्या जर्सीचा एजाज पटेल करणार लिलाव, ‘हे’ आहे मोठे कारण
“वॉर्नर सरावापेक्षा जास्त पार्ट्या करायचा, सतत टीममेट्सशी भांडल्यामुळे संघाबाहेरही केले होते”
एकच मारला पण सॉलीड मारला! इशान किशनने तेवतियाला खेचला १०४ मीटरचा षटकार, Video व्हायरल