पुणे, 23 ऑक्टोबर 2023- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित व एमसीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत 12 संघांना आमंत्रित करण्यात आले आहे. ही स्पर्धा 24 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार असून पीवायसी हिंदू जिमखाना,डेक्कन जिमखाना, क्लब ऑफ महाराष्ट्र, बारणे क्रिकेट अकादमी, आर्यन्स, ब्रिलियंटस, डिव्हीसीए व पुना क्लब मैदानावर स्पर्धेचे सामने होणार आहेत.
पाथ-वे फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत जाधव आणि सचिव सिद्धार्थ निवसरकर यांनी सांगितले की, या स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना, पुना क्लब, क्लब ऑफ महाराष्ट्र, दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी, कॅडन्स क्रिकेट अकादमी, युनायटेड स्पोर्ट्स, ब्रिलीयंटस स्पोर्ट्स क्लब, पुनीत बालन केदार जाधव क्रिकेट अकादमी(पीबीकेजे) आणि ऍबिशियस क्लब हे 12 संघ झुंजणार आहेत. ही स्पर्धा साखळी व सुपरलीग पध्दतीने होणार आहे. 12 संघांची दोन गटांमध्ये प्रत्येकी 6 संघ अशी विभागणी करण्यात आली आहे. साखळी सामन्यांमधील अव्वल चार संघांमध्ये उपांत्य फेरीची लढत होणार आहे. स्पर्धेला दोशी इंजिनिअर्स यांचे प्रायोजकत्व लाभले असून रानडे रिएल्टर्स, राजीव एन्टरप्रायझेस यांचे सह प्रायोजकत्व लाभले आहे.
ते पुढे म्हणाले की, पाथ-वे फाउंडेशनच्या वतीने सलग चौथ्या वर्षी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे सामने 50 षटकांचे होणार असून स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्ठीरक्षक आणि मालिकावीर यांना देखील आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये रोहित खडकीकर, आशुतोष सोमण, कुणाल मराठे यांचा समावेश आहे. (12 teams participated in Doshi Engineers Trophy Interclub Senior Cricket Tournament)
महत्वाच्या बातम्या –
अफगाणिस्तानने केले विजयाचे सीमोल्लंघन! पाकिस्तानच्या पदरी वर्ल्डकप इतिहासातील सर्वात मानहानीकारक पराभव
पुनित बालन ग्रुप आणि माणिकचंद यांच्याकडून एमसीएला मदतीचा हात, झाला पाच वर्षांसाठी महत्वाचा करार