---Advertisement---

अंडी-ब्रेड, डिडिएलजे अन् बरंच काही! भारतीय खेळाडूंचा ‘रॅपीड फायर’ सेशन बनवेल तुमचाही दिवस

---Advertisement---

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. १८ जूनपासून हा ऐतिहासिक सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान खेळला जाईल. या सामन्यापूर्वी भारतीय संघ आपापसात इंट्रास्कॉड मॅच खेळत आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघातील काही सदस्यांचा एक मजेदार व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये खेळाडू रॅपिड फायर प्रश्नांची उत्तरे देताना दिसून आले.

भारताच्या पांडवांचा रॅपिड फायर
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात उतरण्यापूर्वी भारतीय खेळाडू सरावासह मजामस्ती करताना आढळून आले. संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा, प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा व मोहम्मद शमी यांचा एक व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सर्व खेळाडूंना तीन प्रश्न विचारण्यात आले.

आवडीचा नाश्ता बॉलीवूड आणि इंग्लंड कनेक्शन
तुम्हाला इंग्लंडमधील नाश्ताच्या कोणता पदार्थ आवडतो? या प्रश्नावर अनेकांनी अंडी ब्रेड हे उत्तर दिले. मात्र शाकाहारी असणाऱ्या चेतेश्वर पुजारा याने ब्राऊन टोस्ट व बेक बीन्स हे आवडीचे असल्याचे सांगितले.

या सर्व खेळाडूंना दुसऱ्या प्रश्नांमध्ये लंडनमध्ये चित्रीकरण झालेल्या तीन चित्रपटांची नावे विचारली. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ व ‘नमस्ते लंडन’ ही दोन नावे सर्वांच्या उत्तरांमध्ये होती. काहींनी ‘कल हो ना हो’ हे देखील उत्तर सांगितले.

अखेरच्या प्रश्नामध्ये इंग्लंडमध्ये करायला आवडणाऱ्या गोष्टींविषयी विचारले असता सर्वांनी एकमुखाने इंग्लंडमध्ये फिरायला तसेच खरेदी करायला आवडते, असे उत्तर दिले. हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीला उतरताना दिसतोय.

सर्व खेळाडूंना इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव
भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या इशांत शर्माने तीनवेळा इंग्लंडचा दौरा केला आहे. तर, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन आश्विन व चेतेश्वर पुजारा यापूर्वी दोन वेळा इंग्लंडमध्ये खेळले आहेत. मोहम्मद शमी केवळ दुसऱ्यांदा इंग्लंडमध्ये कसोटी खेळताना दिसेल.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvNZ: टीम इंडिया, सिनेमातील पोलीसांप्रमाणे काम करा; दिग्गजाच्या छुप्या संदेशाचा अर्थ काय?

‘विराट’ फटका! गोलंदाजाच्या चेंडूवर कोहलीचा गगनचुंबी षटकार, सर्व खेळाडू पाहतचं राहिले

श्रीलंकाविरुद्धची फ्लॉप कामगिरी, ‘या’ खेळाडूंच्या टी२० विश्वचषकाच्या स्वप्नावर फेरेल पाणी!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---