इंग्लंड क्रिकेट संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानला पोहोचला आहे. तब्बल सतरा वर्षानंतर उभय संघांमध्ये पाकिस्तान कसोटी सामना होणार आहे. पहिली कसोटी सुरू होण्यासाठी 24 तासांचा अवधी शिल्लक असतानाच, पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाहुण्या इंग्लंड संघातील तब्बल 14 सदस्यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी सरावातून माघार घेतल्याची माहिती देण्यात आलीये.
उभय संघांदरम्यान 1 डिसेंबरपासून रावळपिंडी येथे पहिल्या कसोटीला सुरुवात होईल. मात्र, त्याचवेळी पाकिस्तान संघातील खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांना बरे वाटत नसल्याची माहिती इंग्लंड संघाच्या प्रवक्त्याने दिली आहे. याच कारणाने संघाचे अखेरचे सराव सत्र देखील रद्द केले गेले. या संपूर्ण प्रकरणावर डॉक्टर लक्ष ठेवत असून, लवकरच याबाबतची इतर माहिती देण्यात येईल.
14 members in England camp are unwell in Pakistan including Stokes due to a virus. (Source – TMS)
— Johns. (@CricCrazyJohns) November 30, 2022
उभय संघांमध्ये 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असलेल्या या मालिकेतील पहिला सामना 1 ते 5 डिसेंबर दरम्यान रावळपिंडी येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना 9 ते 13 डिसेंबर या कालावधीत मुलतान येथे होईल. तर, अखेरचा सामना 17 ते 21 डिसेंबर यादरम्यान कराची येथे खेळला जाईल.
(14 members in England camp are unwell in Pakistan including Stokes due to a virus)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सॅमसनला वगळल्याने शशी थरूर यांची संघ व्यवस्थापनावर आगपाखड; लक्ष्मण-पंतला धरले धारेवर
पंतच्या उलट्या बोंबा! सतत फ्लॉप ठरल्यानंतर म्हणतोय, “माझी तुलना करू नका”