---Advertisement---

१४० किलो वजनाच्या वेस्टइंडीजच्या खेळाडूने पकडला अप्रतिम झेल, कॅप्टनही झाला अवाक्

On: रविवार, जुलै 26, 2020 10:58 AM
---Advertisement---

मुंबई । ओली पोपच्या (नाबाद 91) आणि विकेटकीपर जोस बटलर (56 नाबाद) यांनी पाचव्या विकेटसाठी 136 धावांची नाबाद भागीदारी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसर्‍या आणि निर्णायक कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडला 4 बाद 258 धावांची भक्कम धावसंख्या उभारता आली. अशा परिस्थितीत विंडीजचा अष्टपैलू रहकीम कॉर्नवॉलने स्लिप्समध्ये शानदार झेल टिपला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

निर्णयाक मालिकेत रोस्टन चेस गोलंदाजी करत होता. बर्न्स 57 धावांवर  फलंदाजी करीत असताना चेंडू त्याच्या बॅटला स्पर्श करत स्लीपकडे गेला आणि  जागेवर उभे राहून रहकीम कॉर्नवॉलने झेल टिपला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पोपने काही लक्षवेधी फटकेबाजी केली आणि जेसन होल्डरला चौकार मारत अर्धशतक ठोकले. गेल्या काही दिवसात धावांसाठी झगडत असलेल्या बटलरने रहकीम कॉर्नवालच्या एका षटकात दोन षटकार ठोकत आत्मविश्वास वाढविला. गेल्या वर्षी सप्टेंबरनंतर त्याने पहिले अर्धशतकही पूर्ण केले होते, हे कसोटीतील त्याचे 16 वे अर्धशतक आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे लवकरच समाप्त झाला.पोप आणि बटलरने पाचव्या विकेटसाठी 166 धावांची भर घातली होती. तिसर्‍या सत्रात या दोघांनी वेस्ट इंडीजला कोणतेही यश मिळू दिले नाही.  इंग्लंडने पहिल्या दोन सत्रात दोन गडी गमविल्यामुळे दबाव निर्माण झाला.

पहिल्या सत्रात इंग्लंडने सलामीवीर डॉमिनिक सिब्ले (0) आणि रूट (17) च्या विकेट गमावल्या, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात 176 आणि नाबाद 78 धावा करणारा बेन स्टोक्स या सामन्यात (20)धावा करू शकला आणि बर्न्सची विकेटही स्वस्तात गेली. तिसर्‍या सत्रात पोप आणि बटलरने प्रभावी फलंदाजी केली.

महत्त्वाच्या बातम्या- 

आयपीएल २०२० खेळण्यासाठी खेळाडूंना देणार का परवानगी, पहा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचा काय आहे निर्णय

बेन कटिंगने खरेदी केला आलिशान बंगला; किंमत ऐकून व्हाल हैराण

टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ३- गब्बरची कसोटी क्रिकेटमध्ये जबर एन्ट्री

इंग्लंडला पहिला विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू २७ व्या वर्षी निवृत्त झाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---