बरोबर १४५ वर्षींपूर्वी १८७७ साली जगातील पहिला कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. हा सामना १५ ते १९ मार्च १८७७ दरम्यान खेळवण्यात आला होता. आल्फ्रेड शॉ या इंग्लंडच्या गोलंदाजाने पहिला चेंडू टाकला होता तर चार्ल्स बँनरमन यांनी पहिली धाव आणि पहिलं शतक केलं होत.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २४५ धावा केल्या होत्या, त्यात एकट्या चार्ल्स बँनरमनच्या १६५ धावा होत्या. इंग्लंडचा पहिला डाव १९६ धावांवर संपुष्टात आला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ४९ धावांची माफक आघाडी मिळाली होती. मात्र दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचीही फलंदाजी ढेपाळली आणि त्यांचा डाव १०४ धावांमध्ये संपला.
त्यामुळे केवळ १५३ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा दुसरा डाव फक्त १०८ डावात संपुष्टात आला आणि ऑस्टेलियाने ४५ धावांनी विजय मिळवून इतिहासातील पहिला कसोटी सामना जिंकला.
या सामन्याला आज (१५ मार्च) १४५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काही खास आकडेवारीवर नजर टाकू
कोणता संघ कोणत्या साली शंभरावी कसोटी खेळाला:
१९०९ इंग्लंड
१९१२ ऑस्ट्रेलिया
१९४९ द.आफ्रिका
१९६५ वेस्ट इंडिज
१९६७ भारत
१९७२ न्यूजीलंड
१९७९ पाकिस्तान
२००० श्रीलंका
२०१६ झिम्बाब्वे
२०१७ बांगलादेश
आज कोणतं क्रिकेट किती वर्षांचं झालय?
१४५ वर्ष: कसोटी क्रिकेट
५१ वर्ष, २ महिने, ११दिवस: एकदिवसीय क्रिकेट
१७ वर्ष, ७ महिने, ११ दिवस : ट्वेंटी२०
कोण किती कसोटी खेळलं
१०४६- इंग्लंड
८४१- ऑस्ट्रेलिया
५६२- भारत
५६१- वेस्ट इंडिज
४५५- न्यूजीलँड
४५०- दक्षिण आफ्रिका
४४३- पाकिस्तान
३०१- श्रीलंका
१२८- बांगलादेश
११५- झिम्बाब्वे
६ – अफगाणिस्तान
३ – आयर्लंड
१ -आयसीसी वर्ल्ड इलेव्हन
कसोटीमध्ये भारताची कामगिरी
५६२ सामने – खेळले
१६८ सामने- विजय
१७३ सामने – पराभव
२२० सामने – अनिर्णित
१ सामना – बरोबरी
(*सर्व आकडेवारी १५ मार्च २०२२ नुसार)
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ मध्ये सामन्यात मिळणार चार डीआरएस, नवीन नियम जाहीर; वाचा सविस्तर
ना धोनी, ना कोणी; केवळ ‘यष्टीरक्षक’ रिषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये साधलाय ‘तो’ पराक्रम