वेलिंग्टन | न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आजपासून (6 फेब्रुवारी) 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने एक खास विक्रम केला आहे.
धोनीने या सामन्यात 13 धावा करताना आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 1500 धावा पूर्ण केला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1500 धावांचा टप्पा पार करणारा तो भारताचा केवळ चौथा फलंदाज तर जगातील 22 वा खेळाडू ठरला आहे.
भारताकडून आत्तापर्यंत रोहित शर्मा, विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी टी20 मध्ये 1500 धावांचा टप्पा पार केला आहे.
रोहित आणि विराट हे आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
धोनीने आत्तापर्यंत 94 टी20 सामन्यात 37.73 च्या सरासरीने 1509 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
भारताकडून टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू –
2238 धावा – रोहित शर्मा
2167 धावा – विराट कोहली
1605 धावा – सुरेश रैना
1509 धावा – एमएस धोनी
1261 धावा – शिखर धवन
महत्त्वाच्या बातम्या-
–वन-डे पाठोपाठ टी२०मध्येही सांगली एक्सप्रेस स्म्रीती मंधनाचा धडाका सुरूच…
–भाई-भाई: ‘पंड्या ब्रदर्स’ टीम इंडियाकडून एकत्र खेळणारी तिसरी भावांची जोडी…
–न्यूझीलंड-भारत टी२० मालिका हा संघ जिंकणार, जाणून घ्या कारण
–मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी या महिन्यातील ही आहे सर्वात मोठी खुशखबर