भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने काही दिवसांपूर्वीच आपण टी२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचे घोषित केले आहे. त्याच वेळी आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघातील दोन वरिष्ठ खेळाडूंनी विराट कोहलीच्या ड्रेसिंग रूममधील वर्तणूकीबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांच्याकडे तक्रार केली असल्याची बातमी समोर येत आहेत. एका आघाडीच्या वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले होते.
या दोन खेळाडूंनी केली होती तक्रार
एका आघाडीच्या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार,
‘जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली याने संघाचे अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्यावर नाव न घेता धीम्या गतीने फलंदाजी करण्याचा ठपका ठेवला होता. विराटने सामन्यानंतर, बाद होण्याच्या भीतीपेक्षा धावा काढण्याची मानसिकता असावी असे म्हटले होते.’
या वृत्तामध्ये पुढे लिहिले गेले आहे की,
‘विराटच्या या आरोपांनंतर भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे व अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा यांनी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती व कर्णधार पदाबाबत नाराजी व्यक्त केलेली.’
त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर विराटने रहाणे व पुजाराला सर्व सामन्यांमध्ये संधी दिली होती. यापूर्वी, रविचंद्रन अश्विन हा देखील विराटच्या नेतृत्वाबद्दल नाराज असल्याची बातमी समोर आली होती.
विराटने सोडले टी२० संघाचे नेतृत्व
विराट कोहलीने आयपीएल सुरू होण्यापूर्वी आपण टी२० विश्वचषकानंतर भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासह कर्णधार म्हणून देखील हा आपला अखेरचा हंगाम असेल असे त्याने सांगितले. टी२० विश्वचषकानंतर त्याच्या भारतीय वनडे संघाच्या नेतृत्वाबाबत देखील निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘शमीची कृपा, त्याच्यामुळेच मी फॉर्मात परतलो’, हार्दिकने प्रतिस्पर्धी खेळाडूला दिले श्रेय
‘त्या’ गेम चेंजिंग ओव्हरनंतर आली पोलार्डची प्रतिक्रिया, म्हणाला…
“टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर सर्व देश पाकिस्तानसोबत खेळण्यासाठी त्यांच्या मागे धावतील”