---Advertisement---

कसे असेल ऍडलेडमधील वातावरण आणि खेळपट्टीचे रूप; जाणून घ्या एका क्लिकवर

On: बुधवार, डिसेंबर 16, 2020 9:22 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून (१७ डिसेंबर) ऍडलेड येथे सुरुवात होईल. मालिकेतील पहिला सामना गुलाबी चेंडूने दिवस-रात्र स्वरूपात प्रकाशझोतात खेळवला जाईल. ही प्रतिष्ठेची मालिका सुरू होण्यास अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. त्याच अनुषंगाने, सामन्यादरम्यान ऍडलेडमधील हवामान आणि खेळपट्टीचे रूप कसे असेल, याविषयी माहिती समोर येत आहे.

असे असेल ऍडलेडमधील हवामान
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील पहिला सामना उद्या सुरु होईल. त्याआधी, एक्वा वेदर यांनी पुढील पाच दिवस ऍडलेडमधील हवामान कसे असेल, याचा अहवाल दिला आहे. एक्वा वेदरने १७ ते २१ डिसेंबरपर्यंतच्या हवामानाचा अंदाज सांगताना म्हटले, हे पाचही दिवस ऍडलेडमधील वातावरण ढगाळ राहील. पावसामुळे अनेकदा सामन्यात व्यत्यय निर्माण होऊ शकतो. सामन्यादरम्यान आर्द्रता ३०-६५ दरम्यान राहील.

फलंदाजांना मदत करेल खेळपट्टी
ऍडलेडची खेळपट्टी पारंपारिकरित्या फलंदाजांना मदतगार असते. या खेळपट्टीवर दोन्ही संघ उत्कृष्ट फलंदाजी करतील. नव्या चेंडूने वेगवान गोलंदाज चांगला मारा करू शकतात. तसेच, सुरुवातीला चेंडू चांगला स्विंग होऊ शकतो. चौथ्या-पाचव्या दिवशी फिरकीपटू सामन्यात आपल्या संघाला पकड मिळवून देऊ शकतात.

इथे पाहता येणार सामना
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता सुरू होतील. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी टेन १, सोनी टेन ३ व सोनी सिक्स या वाहिन्यांवर केले जाईल. सोनी लिव ॲपवर सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग होईल

संबधित बातम्या:
– ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय प्लेईंग इलेव्हनची घोषणा; या खेळाडूला मिळाली संधी
– पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या अष्टपैलूला तब्बल ४ वर्षांनंतर स्थान
– एक नजर इकडेही टाका! १२० पेक्षा अधिक देशात पाहिली जाणार भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका
 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---