---Advertisement---

ज्युनियर द्रविडचा फलंदाजीत राडा! २ महिन्याच्या आत ठोकले दुसरे द्विशतक

On: मंगळवार, फेब्रुवारी 18, 2020 8:01 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या माजी क्रिकेटपटूंच्या मुलांची नावे गाजत आहेत. यात आता भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचाही मुलगा क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसून आला आहे. त्याने 2 महिन्यांच्या कालावधीत दुसरे द्विशतक केले आहे.

समित द्रविड सध्या शालेय स्तरावर क्रिकेट खेळतो. समित हा 14 वर्षांखालील वयोगटातून मल्ल्या अदिती इंटरनॅशनल स्कूल संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने नुकतेच 11 फेब्रुवारीला बंगळूरुमधील बीटीआर शिल्ड अंडर -14 ग्रुप I, डिव्हिजन II स्पर्धेत हे द्विशतक केले आहे.

त्याने मल्ल्या अदिती इंटरनॅशनल स्कूलकडून खेळताना बीजीएस नॅशनल पब्लिक स्कूलविरुद्धच्या या सामन्यात आक्रमक खेळताना 144 चेंडूत 26 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 211 धावा केल्या. त्याच्या या द्विशतकामुळे त्याच्या संघाने 50 षटकात 3 बाद 386 धावा केल्या. त्यानंतर बीजीएस नॅशनल पब्लिक स्कूलला 3 बाद 254 धावाच करता आल्या. त्यामुळे मल्ल्या अदिती इंटरनॅशनल स्कूलने हा सामना 132 धावांनी जिंकला.

Screengrab: ksca.cricket/

समीतने याआधी मागीलवर्षी डिसेंबरमध्ये कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या 14 वर्षांखालील आंतर-विभागीय स्पर्धेत द्विशतक करत त्याची छाप सोडली होती.

त्याने या स्पर्धेत वाइस प्रेसिडेंड इलेव्हन संघाकडून खेळताना धारवाड विभागाविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात 250 चेंडूत 22 चौकारांसह 201 धावांची द्विशतकी खेळी केली होती. तसेच त्याने याच सामन्यात दुसऱ्या डावातही दमदार फलंदाजी करताना 82 चेंडूत 15 चौकारांसह नाबाद 94 धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर त्याने या सामन्यात 3 विकेट्सही घेतल्या होत्या.

https://twitter.com/Maha_Sports/status/1229770652820869121

https://twitter.com/Maha_Sports/status/1229768963048996864

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---