टी२०च्या इतिहासात खूप अशा खेळी खेळल्या गेल्या ज्याने तो फलंदाज सगळ्यांच्या लक्षात राहिला. असे अनेक फलंदाज आहेत, ज्यांनी या प्रकारात खेळताना मोठे विक्रम रचले. काहींनी नकोसे विक्रमही केले. पण खेळ म्हटलं की यश-अपयश हे येतंच. त्यामुळे बऱ्याचदा फलंदाज कितीही दिग्गज असला तरी त्याच्यावर शुन्यावर बाद होण्याची वेळ येते.
टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शून्य धावांवर बाद होणारे फलंदाज म्हणजे श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान, पकिस्तानचा उमर अकमल, आयर्लंडचा केविन ओ’ब्रायन जे प्रत्येकी १० वेळा शून्य धावांवर बाद झाले आहेत. भारताचा रोहित शर्मा ६ वेळा शून्य धावांवर बाद झाला आहे.
तसेच टी-२० सामन्यात असे फलंदाज सुद्धा आहेत जे कधीही शून्य धावांवर बाद झाले नाहीत. जर का कमीत कमी १० डाव खेळलेल्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाल्यास जगात १०३ फलंदाज असे आहेत जे, अजूनपर्यंत शून्यावर बाद झाले नाहीत. ह्या गोष्टीमध्ये सर्वात भारी विश्वविक्रम साउथ आफ्रिकेचा डेविड मिलरचा आहे, जो ८१ सामन्यात ७१ डावात एकदाही शून्यावर बाद झाला नाही. भारताकडून ह्या यादीत फक्त दोनच खेळाडूंची नावे आहेत, जे कधीही शून्य धावांवर बाद झाले नाहीत. ह्या लेखामार्फत जाणून घेऊया कोण आहेत ते दोन फलंदाज.
१. इरफान पठाण
साल २००६ च्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाकडून पहिला आंतरराष्ट्रीय टी -२० सामना खेळणाऱ्या इरफानने २०१२ पर्यंत इरफानने २४ सामने खेळले आणि त्यामधल्या १४ डावात एकूण १७२ धावा केल्या. पण एकून १४ डावात इरफान पठाण कधीही शून्य धावांवर बाद झाला नाही. इरफानने आपल्या आंतरराष्ट्रीय टी२०च्या कारकिर्दीत २८ गडीसुद्धा बाद केले.
२.रविचंद्रन अश्विन
साल २०१०ला झिम्बावे विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अश्विनने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना २०१७ला खेळला. अश्विनने एकूण ४६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत आणि ११ डावात फलंदाजी केली आहे. अश्विनची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ३१ आहे. अश्विनने टी२० मध्ये १२० धावा केल्या आहेत. अश्विन इतक्या टी२० सामन्यात कधीही शून्य धावांवर बाद झाला नाही. अश्विनने गोलंदाजीत ५२ गडी बाद केले आणि भारताकडून सर्वात जास्त टी२० गडी बाद करणारा तो तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सध्याच्या भारतीय संघातील ३ गोलंदाज, ज्यांनी विलियम्सनला कसोटीत केले सर्वाधिकवेळा बाद
पॅट कमिन्सच्या ऐवजी ‘या’ गोलंदाजांना केकेआर देऊ शकतात उर्वरित आयपीएल २०२१ साठी संधी
‘हॅलो साउथम्पटन’! भारतीय संघाचा ताफा इंग्लंडमध्ये दाखल, बघा खास फोटो