भारतीय संघाकडून असे अनेक फलंदाज होऊन गेले आहेत, ज्यांना पार्ट टाईम म्हणजेच अर्धवेळ गोलंदाज म्हटले जाते. जर असे मुख्य फलदाजांबद्दल बोलायचं झालं, तर त्यामध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, विरेद्र सेहवाग आणि युवराज सिंग या मुख्य खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे.
सचिनने तर आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत २०१ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, त्याच्यासारखी गोलंदाजीची आकडेवारी चांगल्या- चांगल्या गोलंदाजांचीही नसते. त्याचबरोबर गांगुलीनेही आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १०० पेक्षाही अधिक विकेट्स मिळविल्या आहेत. सेहवाग आणि युवराज यांच्या नावावरही अनेक विकेट्स आहेत.
या लेखात आपण भारतीय संघाच्या त्या फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या नावावर गोलंदाजीत आश्चर्यचकीत विक्रम आहे.
गोलंदाजीत अाश्चर्यकारक विक्रम असणारे २ भारतीय दिग्गज फलंदाज- 2 Indian Batting Legends Unexpected Record In Bowling
२. युवराज सिंग
भारतीय वनडे इतिहासात दिग्गज फलंदाजांमध्ये सामील असणाऱ्या युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) नावावर गोलंदाजीमध्ये एक आश्चर्यचकित करणारा विक्रम आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय वनडे कारकीर्दीत एकूण १११ विकेट्स चटकावले आहेत. तसेच त्याने २०११ च्या विश्वचषकाच्या एका सामन्यात उत्कृष्ट विक्रम आपल्या नावावर केला आहे. युवराजने ६ मार्च २०११ मध्ये बेंगळुरु येथे आयर्लंडविरुद्ध ३१ धावा देत ५ विकेट्स चटकावत सर्वांना चकित केले होते. हा एकमेव वनडे सामना होता, ज्यात त्याने ५ विकेट्स घेतल्या.
याव्यतिरिक्त त्याने ७५ चेंडूत ५० धावांची अर्धशतकी खेळीही केली होती. तो एकमेव भारतीय खेळाडू आहे, ज्याच्या नावावर विश्वचषकातील एकाच सामन्यात अर्धशतक आणि ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
जागतिक क्रिकेटमध्ये हा विक्रम त्याच्या व्यतिरिक्त केवळ बांगलादेशचा खेळाडू शाकिब अल हसनच्या नावावर आहे. त्याने २०१९ विश्व चषकात अफगाणिस्तानविरुद्ध हा विक्रम केला होता.
१. सचिन तेंडुलकर
जागतिक क्रिकेटमध्ये फलंदाजांतील सर्वाधिक विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) गोलंदाजीमध्येही चकित करणारा विक्रम केला आहे. त्याने आपल्या वनडे कारकीर्दीत एकूण १५४ विकेट्स घेणाऱ्या सचिनच्या नावावर भारताकडून सर्वात कमी वयात विकेट घेण्याचा विक्रम आहे. ५ डिसेंबर १९९० मध्ये पुणे येथे श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात खेळताना हा कारनामा आपल्या नावावर केला होता. त्यावेळी त्याचे वय केवळ १७ वर्षे २२४ दिवस इतके होते.
याव्यतिरिक्त सचिनने एकमेव असा गोलंदाज आहे, ज्याने शेवटच्या षटकात २ वेळा ६ किंवा त्यापेक्षा कमी धावा दिल्या आहेत. आशिया चषकात स्पर्धेत फिरकीपटू गोलंदाज म्हणून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमदेखील भारतीय संघाचा गोलंदाज सचिनच्या नावावर आहे. त्याने आशिया चषक २००४मध्ये ६ सामन्यात १२ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने एकाच मैदानात २ सामन्यांमध्ये ५ विकेट्स घेण्याचा विक्रमही बनवला आहे.
ट्रेंडिंग लेख-
-टीम इंडियाकडून कसोटीत सर्वात वेगवान अर्धशतक करणारे २ धडाकेबाज फलंदाज
-१२ पेक्षा कमी चेंडू खेळूनही मॅन ऑफ द मॅच ठरलेले ३ खेळाडू
-आयपीएलमध्ये खेळलेले ५ वयस्कर खेळाडू; एक आहे तब्बल ४५ वर्षांचा