कसोटी सामन्यात फलंदाजांची खरी परीक्षा असते म्हणून कसोटीला क्रिकेटचा खरा प्रकार मानलं जातं. कसोटी सामन्यात फलंदाजांनी अनेकदा मोठे डाव तासनतास खेळपट्टीवर टिकून खेळले आहेत आणि गोलंदाजांनी देखील उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. कसोटी सामन्यात बऱ्याचदा फलंदाज आक्रमक फलंदाजी करत नाही, त्यामुळे गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट जास्ती नसतो. पण, असेही काही फलंदाज आहेत, ज्यांनी कसोटीत आक्रमक फलंदाजी केली आहे, तर काही गोलंदाजांनी एकाच षटकात बऱ्याच धाव दिल्या आहेत.
आज आपण त्या २ भारतीय गोलंदाजांबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी एका षटकात सर्वाधिक धावा दिल्या आहेत.
१. हरभजन सिंग
हरभजन सिंग हा कसोटी सामन्यात एका षटकात सर्वाधिक धावा देणारा भारतीय गोलंदाज आहे. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने त्याच्या षटकात खूप धावा केल्या होत्या. हरभजन सिंगने २००५-०६ मध्ये लाहोरमध्ये झालेल्या सामन्यात एका षटकात २७ धावा दिल्या होत्या. शाहिद आफ्रिदीने त्याला ४ षटकार ठोकले होते. तो सामना अनिर्णित राहिला होता.
२. मुनाफ पटेल
कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा देण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मुनाफ पटेल आहे. तो भारताकडून जलद गोलंदाज म्हणून खेळत होता आणि २०११च्या विजयी विश्वचषकाच्या संघाचा भाग होता. त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करून भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मदत केली होती. मुनाफ पटेलने २००६ मध्ये कसोटीत एका षटकात २५ धावा दिल्या होत्या. त्याला विंडीजच्या रमेश सारवानने ६ चौकार मारले होते.
तसेच जगभरातल्या खेळाडूंबद्दल बोलायचं झालं, तर ह्या यादीत दिग्गज खेळाडू आहेत. इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अँडरसनच्या नावावर एका षटकात सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका षटकात २८ धावा दिलेल्या. ह्यासोबतच जो रूट आणि रॉबिन पीटरसन ह्यांनी देखील एका षटकात २८ धावा दिल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतामागे न्यूझीलंडची साडेसाती! गेल्या १५ वर्षांत सातत्याने आयसीसी स्पर्धेत ठरतोय अडथळा
डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच शिखर धवन भारतीय जर्सीतून दिसला सुटाबुटात, व्हिडिओ व्हायरल
विराट-एबीनंतर कोण असेल आरसीबीचा नवा कर्णधार ? धोनीच्या जुन्या सहकाऱ्याने दिले ‘हे’ उत्तर