क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये सातत्याने धावा करणे सोपी गोष्ट नाही. अनेकदा असेही होते की, कसोटी क्रिकेटमध्ये अधिक धावा करणारा फलंदाज वनडे क्रिकेटमध्ये तितकासा यशस्वी होत नाही आणि टी-२० आणि वनडे सामन्यात चांगला खेळणारा फलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये जास्त धावा करत नाही.
क्रिकेटच्या तीन प्रकारानुसार स्वत: ला मोल्ड करणे आणि धावा करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड सारख्या क्रिकेटपटूंनी वनडे आणि कसोटी स्वरूपात बऱ्याच धावा केल्या. पण असे काही भारतीय क्रिकेटपटू होते, जे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करून धावा करू शकले आणि कसोटी क्रिकेटमध्ये मात्र फ्लॉप झाले.
या लेखात अशा २ भारतीय क्रिकेटपटूंचा आढावा घेतला आहे, ज्यांच्या नावावर वनडे आणि टी-२० क्रिकेटमधील बऱ्याच विक्रमांची नोंद आहे. तसेच त्यांनी भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. परंतु कसोटी क्रिकेटचा विचार केला तर या स्वरूपात त्यांची कामगिरी काही खास नाही.
कसोटी क्रिकेटमध्ये नापास झालेले २ दिग्गज भारतीय क्रिकेटपटू-
२. सुरेश रैना (Suresh Raina)
डावखुरा फलंदाज सुरेश रैना या यादीत आहे. सुरेश रैनाने भारताकडून वनडे आणि टी-२० सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. २०११ मध्ये वनडे विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघाचा तो सदस्य होता.
सुरेश रैनाने आतापर्यंत २२६ वनडे सामने खेळले आहेत आणि ३५.३१ च्या प्रभावी सरासरीने ५६१५ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये ५ शतके आणि ३६ शतके ठोकली आहेत. मधल्या फळीत महत्त्वाच्या वेळी चांगली खेळी खेळून त्याने अनेकदा संघाला विजय मिळवून दिला आहे.
त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकीर्दीबद्दल बोलायचे तर त्याने आतपर्यंत खेळलेल्या ७८ सामन्यात २९.१८ च्या सरासरीने १६०५ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर टी-२० मध्ये एक शतकही आहे. पण जर कसोटी क्रिकेटचा विचार केला तर येथे सुरेश रैनाची कामगिरी काही खास नाही. भारताकडून रैना १८ कसोटी सामन्यांमध्ये खेळला आणि २६.४८ च्या सरासरीने केवळ ७६८ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने फक्त १ शतक झळकावले आहे.
१. युवराज सिंग (Yuvraj Singh)
युवराज सिंग हा त्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट हिटर आणि धोकादायक फलंदाज मानला जायचा. २००७ टी-२० आणि २०११ मधील वनडे विश्वचषकात युवराजचे योगदान महत्त्वपूर्ण होते.
२००० मध्ये भारताकडून पदार्पण करणाऱ्या युवराजने आपल्या कारकीर्दीत ३०४ वनडे सामने आणि ५८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडे सामन्यात त्याने ३६.५५ च्या सरासरीने ८७०१ धावा केल्या असून, गोलंदाजीत त्याने १११ बळीही घेतले आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ११७७ धावा केल्या आणि गोलंदाजीत त्याने २८ बळीही घेतले आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध सलग ६ चेंडूवर ६ षटकार ठोकण्याचा विक्रमदेखील केला आहे. तसेच जलद अर्धशतकाचा विश्वविक्रमही त्याच्या नावावर आहे.
परंतु जर कसोटी क्रिकेटबाबत सांगायचे झाले तर युवराज येथे काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याने भारताकडून ४० कसोटी सामने खेळले असले तरी त्यामध्ये तो फ्लॉप झाला. त्याने ३३.९२ च्या सरासरीने आणि ३ शतकांच्या मदतीने फक्त १९०० धावा केल्या आणि गोलंदाजीत ९ बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
बरोबर ३० वर्षांपुर्वी १७ वर्षीय सचिनने केला होता क्रिकेटमध्ये मोठा कारनामा
…आणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली
ट्रेंडिंग लेख –
…आणि त्या दिवशी १०० शतकांचा पाया रचला गेला
क्रिकेटला रामराम केल्यावर मॅनेजमेंटची डिग्री घेऊन अमेरिकन एक्सप्रेससाठी काम करणारा क्रिकेटर
आचरेकर सर म्हणत, “प्रवीण हा सचिनपेक्षा काकणभर सरस आहे”