आयपीएल ही जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी-२० स्पर्धा मानली जाते. आयपीएलची वैशिष्ट्ये, पैसा आणि नाव हे कुठेतरी खेळाडूंना आकर्षित करतात. आयपीएलमध्ये खेळल्यामुळे बर्याच ज्युनियर खेळाडूंना त्यांच्या राष्ट्रीय संघात सहभागी होण्याची संधीही मिळते. असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या देशाच्या राष्ट्रीय संघात संधी मिळताच स्वतःचे नावेही केले. यामुळे खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यास तयार असतात.
आयपीएलमध्ये खेळण्याव्यतिरिक्त अंतिम सामना खेळण्याची आणि तो जिंकण्याची इच्छा खेळाडूंची असते. अंतिम फेरीत खेळणार्या खेळाडूंना भाग्यवान म्हणता येईल. परंतु, संघासाठी लिलावात खरेदी केलेल्या प्रत्येक खेळाडूला अंतिम सामना खेळण्याची संधी मिळत नाही. अंतिम फेरीच्या अंतिम अकरामध्ये केवळ काही उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू असतात. आयपीएलमध्ये आतापर्यंत ३ वेगवेगळ्या संघांकडून अंतिम सामना खेळणारे दोन खेळाडू आहेत. या लेखात त्याचा आढावा घेतला आहे.
आयपीएलमध्ये ३ संघांकडून अंतिम सामने खेळणारे खेळाडू-
२. युसुफ पठाण (Yusuf Pathan)
युसूफ पठाण हा असा भारतीय खेळाडू आहे ज्याला पहिल्यांदा आयपीएल विजेतेपद जिंकण्याची संधी मिळाली होती. राजस्थान रॉयल्सलाकडून २००८ च्या आयपीएलमध्ये फायनल जिंकण्याचा बहुमान पठाणला मिळाला होता.
यानंतर युसूफ पठाणला २०१२ आणि १४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना अंतिम विजयी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. २०१८ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत असतानाही तो अंतिम सामन्यात खेळला. परंतु त्याला विजयाची चव चाखण्याची संधी मिळाली नाही. युसूफ पठाण तीन संघांसाठी आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळला.
१. शेन वॉटसन (Shane Watson)
आयपीएलमध्ये या खेळाडूने आपली स्फोटक केली करत तीन वेगवेगळ्या संघांकडून अंतिम सामने खेळले आहेत. यूसुफ पठाणप्रमाणे शेन वॉटसननेही राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलची पहिला मोसम खेळला आणि संघ जिंकला.
त्यानंतर त्याला २०१६ मध्ये आरसीबीकडून अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्याच्या संघाचा पराभव झाला. २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत हैदराबादविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने शतकाची खेळी करून संघाला विजयी केलं. यानंतर, २०१९ मध्येही त्याने चेन्नई सुपर किंग्जला विजयाच्या मार्गावर आणले आणि अंतिम सामन्यात अर्धशतक ठोकले, पण शेवटी मुंबई इंडियन्सने हे विजेतेपद जिंकले आणि त्यांचा संघ हरला.
ट्रेंडिंग लेख –
वनडेमध्ये वेगवान ४०० बळी मिळवणारे अव्वल ३ गोलंदाज
वनडे क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज…
भारतीय फुटबॉलचा आधारस्तंभ – सुनील छेत्री
महत्त्वाच्या बातम्या –
‘धोनीपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही’ इंग्लंडच्या खेळाडूने केली धोनीची प्रशंसा…
रैनाने म्हटले रोहितच पुढचा धोनी, तर रोहितने दिले ‘हटके’ प्रत्युत्तर
लॉकडाऊनमध्ये कोणाबरोबर रहायला आवडेल?, ‘या’ खेळाडूने घेतले धोनीचे नाव…