पुणे (10 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आज सहाव्या दिवसाचा खेळानंतर अहमदनगर संघ पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर रत्नागिरी संघाने आज दुसऱ्या स्थानावर झेप घेत प्रमोशन फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. टॉप 4 च्या उर्वरीत दोन जागांसाठी बीड, रायगड व मुंबई शहर या संघाच्या मध्ये चुरस आहे. बीड संघाचे स्थान जवळपास निश्चित असले तरी मुंबई शहर विरुद्ध रायगड सामना बरोबरीत राहिल्यास बीड संघाला शेवटच्या सामन्यात किमान 7 गुणांच्या कमी फरकाने पराभव स्वीकारून गुणतालिकेत 1 गुण मिळवणे आवश्यक असेल. त्यामुळे उद्याचे शेवटचे 2 सामने महत्त्वाचे असणार आहेत.
आज झालेल्या पहिल्या लढतीत रायगड संघाने धुळे संघावर 45-21 असा विजय मिळवत टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी आपल्या आशा कायम ठेवल्या. तर धुळे संघ टॉप 4 च्या शर्यतीतून बाहेर पडल्याने आता त्याना रेलीगेशन फेरी खेळावी लागणार आहे. तर आजच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई शहर ने 48-22 असा विजय मिळवत टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. उद्या मुंबई शहर ची लढत रायगड विरुद्ध असणार आहे
अहमदनगर संघाने जालना संघाचा 69-13 असा धुव्वा उडवत पाचवा विजय संपादन केला. अहमदनगर संघाकडून प्रफुल झवारे ने 19 गुण मिळवले तर आशिष यादव ने 11 गुण मिळवले. संभाजी वाबले ने पकडीत 7 गुण प्राप्त केले. तर प्रसाद गोरे ने अष्टपैलू खेळ केला. तर आजच्या शेवटच्या लढतीत रत्नागिरी संघाने 38-19 अश्या फरकाने बीड संघाचा पराभव करत प्रमोशन फेरीत आपले स्थान निश्चित केले. (2 teams are guaranteed to qualify for the promotion round, while 3 teams are tied for the remaining 2 spots)
संक्षिप्त निकाल-
धुळे जिल्हा 21 – रायगड जिल्हा 45
मुंबई शहर 48 – नांदेड जिल्हा 22
अहमदनगर जिल्हा 69 – जालना जिल्हा 13
रत्नागिरी जिल्हा 38 – बीड जिल्हा 19
महत्वाच्या बातम्या –
तिसऱ्या विजयासह मुंबई शहराची गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप
धुळे संघावर विजय मिळवत रायगड संघ प्रमोशन फेरीच्या शर्यतीत कायम