---Advertisement---

सामना पाहाताना गॅलरी कोसळली अन् शेकडो माणसे चेंगरली, अंगाचा थरकाप उडवणारा Video व्हायरल

Gallery-Collapsed
---Advertisement---

फुटबॉलविश्वातून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. केरळमधील एका स्थानिक फुटबॉल सामन्यादरम्यान एक गंभीर घटना घडली आहे. सामन्यादरम्यान तात्पुर्ती बांधलेली प्रेक्षक गॅलरी अचानक कोसळली. त्यामुळे जवळपास २०० लोक जखमी झाले आहेत, तर ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी झालेल्या सर्वांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे समजत आहे. 

याबरोबरच ज्यांना मोठी दुखापत झालेली नाही, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले असून गंभीर जखमींना जवळच्या हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Gallery Collapsed During Football Match).

https://twitter.com/vshemanathan/status/1505433716297908225?s=20&t=2uRd-C7ANHhNs1sZ–mJxw

माध्यमांतील वृत्तानुसार हा स्थानिक फुटबॉल सामना केरळमधील कलिकावू येथील पूंगोडच्या एलपी स्कूलच्या मैदानावर होत होता. हा ऑल इंडिया सेवेन्स फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना होता. ही स्पर्धा मलप्पुरम जिल्ह्यातील मानाची स्पर्धा असल्याचे म्हणले जाते. त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी स्थानिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती मिळत आहे की, हा सामना पाहण्यासाठी ८००० पेक्षा अधिक लोक उपस्थित होते. तसेच इस्ट स्टँडमध्ये जवळपास ३००० लोक उपस्थित होते, जी स्टँडच्या क्षमचेपेक्षा अधिक संख्या होती.

ही दुर्दैवी घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास झाल्याचे समजत आहे. हा सामना सुरू झाल्यानंतर लगेचच ही घटना घडली आहे. तसेच अशीही चर्चा आहे की, गॅलरीच्या क्षमतेपेक्षा अधिक लोक तिथे बसले होते. तसेच स्थानिक माध्यमांनुसार या सामन्याच्या आयोजकांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे मलप्पुरमचे एसपी यांनी सांगितले आहे. तसेच घटनेचा तपासही केला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

IPL2022| धोनीच्या चेन्नईची चिंता वाढली, ‘या’ प्रमुख अष्टपैलू खेळाडूला अद्याप मिळाला नाही व्हिसा

केकेआर संघासाठी बॅटिंग ऑर्डर बनली मोठी समस्या, श्रेयस अय्यर करणार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी?

इंग्लंडने चक्क ‘नंबर वन’ गोलंदाजाला महत्त्वाच्या मालिकेतून वगळले, मग गोलंदाजानेही व्यक्त केला ‘हा’ मानस

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---