गुरुवारी (3 ऑगस्ट) दिल्ली येथील भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. 2007 टी20 विश्वचषकात भारतीय संघाचे मॅनेजर राहिलेले सुनील देव यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. आधी क्रिकेटपटू आणि नंतर दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) मध्ये त्यांनी प्रशासक म्हणून 2015 पर्यंत काम पाहिले.
सुनील देव यांनी दिल्लीसाठी एक प्रथमश्रेणी सामना खेळला होता. त्यानंतर 70 च्या दशकात त्यांनी क्रिकेट प्रशासनात येण्याचा निर्णय घेतला. 2015 पर्यंत ते डीडीसीएशी संलग्न होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक वेळा भारतीय संघाचे मॅनेजर म्हणून काम पाहिले.
सन 1996 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ते प्रथम संचालक म्हणून भारतीय संघासोबत गेलेले. 2007 वनडे विश्वचषकातील भारताच्या खराब कामगिरीनंतर त्यांच्याकडे मॅनेजर पदाची सूत्रे देण्यात आलेली. तेच मॅनेजर असताना एमएस धोनी याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 2007 टी20 विश्वचषक आपल्या नावे केला होता. त्यानंतर 2014 मध्ये देखील इंग्लंड दौऱ्यावेळी ते मॅनेजर म्हणून भारतीय संघासोबत होते.
(2007 T20 World Cup Manager Sunil Dev Passed Away)
महत्त्वाच्या बातम्या-
देवधर ट्रॉफीत रियान पराग नावाचं वादळ! 259 धावा चोपत घेतल्या ‘एवढ्या’ विकेट्स
बिग ब्रेकिंग! क्रीडा मंत्री झालेल्या भारतीय खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती