---Advertisement---

सुपर ओव्हर ‘मेडन’ टाकणाऱ्या जगातील एकमेव गोलंदाजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

On: शनिवार, मे 26, 2018 4:43 PM
---Advertisement---

शनिवारी विंडीजचा अष्टपैलू खेळाडू सुनिल नारायण आपला ३०वा वाढदिवस साजरा करत आहे. नारायणचा जन्म २६ मे १९८८रोजी त्रिनीदाद आणि टोबॅंगोमध्ये झाला आहे.

त्याने क्रिकेटमध्ये अनेक विक्रमही केले आहे. सुपर ओव्हर मेडन टाकणारा तो जगातील एकमेव गोलंदाज आहे. कॅरेबीयन प्रिमीयर लीगमध्ये रेड स्टील विरुद्ध गयाना अॅमेझाॅन वाॅरियर्समध्ये झालेल्या सामन्यात त्याने ही मेडन ओव्हर टाकली होती. तेव्हा ५व्या चेंडूवर त्याने एक विकेटही घेतली होती.

तो आयपीएल २०१८चा शेवटचा सामना खेळला. या आयपीएलमध्ये त्याने १६ सामन्यात ३५७ धावा आणि १७ विकेट्स घेतल्या आहेत. यावर्षीच्या सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो २०वा तर गोलंदाजांच्या यादीत ८वा आहे. एका हंगामात ३५० धावा आणि १५ विकेट घेणारा सुनिल नारायण केवळ चौथा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे.

त्याने विंडीजकडून ६ कसोटी, ६५ वनडे आणि ४८ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने एकूण ५५० धावा केल्या आहेत तसेच १६३ विकेट्सही घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-१८ वर्षापूर्वी गांगुली आणि द्रविडने रचला होता हा ‘दादा’ विक्रम

राशिद खान अफगाणिस्तानचा हिरो आहे, आम्ही त्याला भारताला देणार नाही!

मोठा खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर

कोणते संघ किती वेळा गेले आहेत आयपीएल फायनलमध्ये?

जे आयपीएल २०१७मध्ये झालं तेच २०१८मध्ये होणार का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment