---Advertisement---

फिफा विश्वचषक 2018: जर्मनीला विश्वचषकापुर्वीच मोठा धक्का, मेसूत ओझिलला दुखापत

On: गुरूवार, जून 7, 2018 7:08 PM
---Advertisement---

फिफा विश्वचषकाला फक्त 7 दिवस राहिले असता जर्मनीचा फुटबॉलपटू मेसूत ओझिलच्या  गुडघ्यास दुखापत झाली आहे.

अर्सेनालचा हा मिडफिल्डर फुटबॉलपटू मेसूत ओझिल हा जर्मनीचा शेवटच्या सराव सामन्यास मुकणार आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो हा सामना खेळणार नाही.

माजी विश्वविजेता जर्मनीचा सराव सामना शुक्रवारी सौदी अरेबिया विरूध्द लेवेरकुसेन येथे होणार आहे.

गुडघ्याच्या दुखापतीमुळे ओझिलचा येणाऱ्या विश्वचषकातील सहभागावर काहीही परिणाम होणार नाही, असे जर्मन फुटबॉल फेडरेशनने स्पष्ट केले आहे.

ओझिलला ऑस्ट्रिया विरूध्दच्या सामन्यात 76व्या मिनीटाला गुडघ्याला दुखापत झाली. हा सामना जर्मनी 2-1 असा जिंकला. यामुळे त्याने नंतरच्या इप्पान, इटली येथील प्रशिक्षण शिबीरात सहभाग घेतला नाही.

ओझिलचा हा तिसरा विश्वचषक आहे. याआधी तो 2010 आणि 2014चा जिंकलेल्या संघात होता. त्याने क्लबचा शेवटचा सामना 1 एप्रिलला स्टोक विरूध्द खेळला आहे. हा सामना त्याच्या क्लबने 3-0 ने जिंकला.

त्याने गुनरर्ससाठी प्रिमीयर लीगमधील 26 सामन्यात 9 गोल केले आहे. तसेच त्याने राष्ट्रीय संघासाठी 90 कॅप्सही जिंकले आहे तर 23 गोल केले आहेत.

 जर्मनीचा फिफा विश्वचषकातील पहिला सामना मेक्सिको विरूध्द 17 जूनला होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment