एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाला आता केवळ १०६ दिवस राहिले आहेत. इंग्लंडमध्ये होणाऱ्या २०१९च्या विश्वचषकात दहा संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघाची गेल्या दोन वर्षातील कामगिरी पाहता या विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी भारत प्रमुख दावेदार असेल.
या विश्वचषकात भारताकडून आपला पहिला विश्वचषक खेळण्यासाठी कुलदीप यादव, युझवेद्र चहल, हार्दीक पंड्या आणि जसप्रीत बुमराहसारखे युवा खेळाडू सज्ज आहेत. तर दुसरीकडे वयाची तीशी पार केलेल्या खेळाडूंचा काही खेळाडूंचा हा शेवटचा विश्वचषक असू शकतो.
१. महेंद्र सिंग धोनी
महेंद्र सिंग धोनी २०१९ विश्वचषक त्याच्या कारकिर्दीतला चौथा विश्वचषक असेल. यापूर्वी धोनीने २००७ राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली कारकिर्दीतला पहिला विश्वचषक खेळला होता. त्यानंतर त्याने २०११ आणि २०१५ विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करत २०११ विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिले.
३६ वर्षीय धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत एकदिवसीय आणि टी-२० कर्णधार पदावरून पायउतार झाला असला तरी त्याची २०१९ विश्वचषकात भारतीय संघातील त्याची जागा जवळपास पक्की आहे. २०२३ साली धोनीचे वय ४०असेल त्यामुळे पुढच्या विश्वचषकापूर्वी धोनी कदाचीत निवृत्त झालेला असेल.
धोनीने ३३८ एकदिवसीय सामन्यात ५०.०८ च्या सरासरीने १०४१५ धावा केल्या आहेत.
२. रोहित शर्मा
सध्याच्या काळातील सर्वोत्तम सलामीवीर रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोतकृष्ट खेळाडू म्हणून क्रिकेट जगतावर आपला ठसा उमठवला आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन वेळा द्विशतके करून त्याने ते सिद्धही केले आहे.
२०१९ विश्वचषकात रोहितची कामगिरी भारतासाठी महत्वाची ठरणार आहे. त्याचा वरच्या फळीतील अनुभव भारतीय फलंदाजीची ताकद असेल.
रोहितने त्याच्या कारकिर्दीतील २०१ एकदिवसीय सामन्यात ४७.६१ च्या सरासरीने ७८०८ धावा केल्या आहेत. यामध्ये तीन द्विशतके, २२ शतके आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे.
इंग्लंडमधिल विश्वचषकात त्याचे भारतीय संघातील स्थान नक्की आहे. मात्र ३१ वर्षीय रोहितचा पुढच्या विश्वचषकातील सहभाग त्याच्या कामगिरी व शारीरिक तंदुरूस्तीवर अवलंबून असेल.
३.शिखर धवन
२०१५ विश्वचषकात भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक ४१२ धावा केल्या होत्या. २०१९ विश्वचषकातही भारतीय संघासाठी शिखर धवनची भूमिका महत्वाची असेल. रोहित शर्माच्या जोडीने त्याने गेल्या तीन वर्षापासून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. धवनने २०१३ पासून कसोटी क्रिकेटमध्येही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
हा विश्वचषक शिखर धवनचा शेवटचा विश्वचषक असू शकतो. ३३ वर्षीय धवनचे वय २०२३ साली ३७ असेल. तसेच संघात स्थान टिकवण्यासाठी नव्या खेळाडूंशी स्पर्धा यांचा विचार करता त्याची २०२३ विश्वचकात निवड होने एकंदरीतच अवघड आहे.
शिखर धवनने १२३ एकदिवसीय सामन्यात ४५.०३ च्या सरासरीने ५१७८ धावा केल्या आहेत. त्यामध्ये १५ शतक आणि २७ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–गांगुली म्हणतो, हा खेळाडू विश्वचषकात टीम इंडियाचा सदस्य नसेल
–टीम इंडियाकडून विश्वचषकात सतत पराभूत होणारा पाकिस्तान यावेळी करणार हिशोब चुकता?
–या दिवशी होणार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
–संपुर्ण यादी- शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा, स्मृती मानधनासह या खेळाडूंना मिळणार पुरस्कार
–हिटमॅन रोहित शर्माबरोबर रिषभ पंतने विश्वचषकात सलामीला यावे