आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषकातील ८वा सामना होणार असुन भारतीय संघाचा पहिलाच सामना आहे. हा सामना भारतीय संघासाठी आपले विजयी अभियान सुरु करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे तर इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध सपाटून मार खाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेसाठी विजयाच्या मार्गावर परतण्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे.
दक्षिण आफ्रिकेचा हा या विश्वचषकातील तिसरा सामना आहे. हा सामना साउथँम्पटनमध्ये रोज बॉल स्टेडीयमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल.
या सामन्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी यष्टीरक्षण करताना दिसणार आहे. २३ मार्च २००७ नंतर धोनी प्रथमच विश्वचषकात खेळाडू म्हणुन खेळणार आहे. २०११ आणि २०१५मध्ये त्याने भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडताना चांगली कामगिरी केली होती.
आज जर भारताच्या या महान माजी कर्णधाराने अर्धशतकी खेळी केली तर भारताकडून वनडेत सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी येईल. धोनीने वनडेत ३४१ सामन्यात ७१ तर सौरव गांगुलीनेही ३११ सामन्यात ७१ अर्धशतके केली आहेत.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ४६३ सामन्यात ९६ तर माजी कर्णधार राहुल द्रविडने ३४४ सामन्यात ८२ अर्धशतके केली आहेत.
आजच्या सामन्यासाठी असे असू शकतात संभाव्य संघ –
भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिका – फाफ डु प्लेसिस, क्विंटॉन डी कॉक, हाशिम आमला, एडन मार्करम, डेविड मिलर, जेपी ड्यूमिनी, रस्सी वॅन दर दसन, अँडील फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, इम्रान ताहिर, ड्वेन प्रीटोरियस.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–ऑस्ट्रेलियाचा हा दिग्गज गोलंदाज म्हणतो, धोनी भारतासाठी महत्त्वाचा घटक…
–विश्वचषक २०१९: दक्षिण आफ्रिकेला धक्का; डेल स्टेन विश्वचषकातून बाहेर, या खेळाडूला मिळाली संधी
–या दिग्गज फुटबॉलपटूने भारताची जर्सी घालून कर्णधार कोहलीला दिल्या विश्वचषकासाठी खास शुभेच्छा