---Advertisement---

या दिग्गज फुटबॉलपटूने भारताची जर्सी घालून कर्णधार कोहलीला दिल्या विश्वचषकासाठी खास शुभेच्छा

---Advertisement---

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात भारताचा पहिला सामना उद्या(5जून) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साउथँम्पटन येथे होणार आहे. या विश्वचषकासाठी विराट कोहली आणि भारतीय संघाला फुटबॉल जगतातील अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

यात आता फिफा विश्वचषक विजेता जर्मनीचा फुटबॉलपटू थॉमस म्यूलरचाही समावेश झाला आहे. त्याने सोशल मीडियातून विराट आणि भारतीय संघाला विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

29 वर्षीय म्यूलरने ट्विट केले आहे की ‘विश्वचषक 2019 साठी सर्व सहभागी संघांना रोमांचकारी सामन्यांसाठी शुभेच्छा. विशेषत: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी मी शुभेच्छा देतो. तो जर्मनी संघाचा चाहता आहे आणि मागे अनेकदा त्याने जर्मनी संघाला पाठिंबा दिला आहे.’

या ट्विटबरोबरच म्यूलरने भारतीय संघाची जर्सी घातलेला आणि बॅट हातात घेतलेला एक फोटोही शेअर केला आहे. त्याच्या या ट्विटवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

म्यूलरच्या आधी भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषकासाठी भीरतीय फुटबॉल पुरुष आणि महिला संघाच्या खेळाडूंनी तसेच ब्राझिल आणि चेल्सीचा डिफेंडर डेव्हिड लुईज तर इंग्लंड आणि टॉटेनहॅम हॉटस्परचा स्ट्रायकर हॅरि केन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय फुटबॉल संघाने दिल्या भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा-

हॅरि केनने घेतली विराट कोहलीची भेट – 

डेव्हिड लुईजने दिल्या भारतीय संघाला शुभेच्छा – 

म्यूलरच्या ट्विटवर आलेल्या चाहत्यांच्या काही प्रतिक्रिया –

https://twitter.com/shantanulal5/status/1135524523959148544

https://twitter.com/fchollywood3/status/1135599473760100355

https://twitter.com/mant_hay/status/1135526727604551680

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

विश्वचषक २०१९: किंग कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हे दोन मोठे पराक्रम करण्याची सुवर्णसंधी

विश्वचषक २०१९: खेळाडूने नाही तर चक्क फोटोग्राफरने घेतला एका हाताने अफलातून झेल, पहा व्हिडिओ

विश्वचषक २०१९: टीम इंडियाच्या पत्रकार परिषदेवर मीडियाचा बहिष्कार, जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment