इंग्लंड आणि वेल्समध्ये 2019 आयसीसी विश्वचषक सुरु आहे. या विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी हा सर्वात अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडू आहे. त्याचे संघात असणे हे भारतीय संघासाठी महत्त्वाचा घटक असणार आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान ग्ले मॅग्राथने म्हटले आहे.
ग्लेन मॅग्राथ म्हणाले, ‘मोठ्या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या भारतावर नेहमीच दबाव असतो. पण ते याआधी मोठ्या स्पर्धेत चांगले खेळले आहेत. पण इंग्लिश परिस्थिती त्यांना पहाणे उत्सुकतेचे आहे. मला वाटते धोनीची उपस्थिती भारतासाठी महत्त्वाचा घटक ठरणार आहे.’
‘त्याचा अनुभव आणि त्याची सामन्याची समज चांगली आहे. त्याला सर्व नीट माहित असते. भारताला याचा फायदा होईल. नुकतेच धोनीने ज्याप्रकारे ऑस्ट्रेलियामध्ये वनडे सामने फिनिश केले ते मला आवडले. भारताकडे अनेक गुणवान खेळाडू आहे. फक्त त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली पाहिजे.’
तीन वेळचे विश्वचषक विजेते खेळाडू असणाऱ्या मॅग्राथ भारताच्या गोलंदाजीबद्दल म्हणाले, ‘भारताचे जसप्रीत बुमराहचा समावेश असणारे आक्रमण.., जसप्रीत बुमराह हा मर्यादित षटकांमधील सध्याचा सर्वोत्तम गोलंदाज आहे.’
‘ज्या लेंथमध्ये तो गोलंदाजी टाकतो आणि शेवटी जे यॉर्कर टाकतो. त्यामुळे तो अखेरच्या षटकांमध्ये जास्त घातक गोलंदाज वाटतो. ते इंग्लंडच्या परिस्थितीत कसे खेळतात हे पहावे लागेल.’
त्याचबरोबर मॅग्राथ यांनी हार्दिक पंड्या हा या विश्वचषकातील युवराज सिंग असल्याचे म्हटले आहे. मॅग्राथ म्हणाले, ‘पंड्या मधल्या फळीत चांगली भूमीका निभावू शकतो. तसेच दिनेश कार्तिकही चांगला फिनिशर आहे. जर तूम्ही विजयी लयीत असाल तर तूम्ही जास्त बदल करणार नाही. मी भारताचा पहिला सामना पाहण्यास उत्सुक आहे.’
पुढे मॅग्राथ यांनी असे सांगितले की पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, कागिसो रबाडा आणि जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांना बघायला त्यांना मजा येईल.
मॅग्राथ यांनी विश्वचषक विजेतेपदासाठी इंग्लंड प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ‘इंग्लंड चांगला वनडे संघ आहे. भारतही चांगले वनडे क्रिकेट खेळतो. इंग्लंड आणि भारत यांच्या खेळण्यात सारखेपणा आहे.’
‘ऑस्ट्रेलियानेही वेळेवर लय पकडली आहे. मला वाटते, ऑस्ट्रेलियाकडेही हा विश्वचषक जिंकण्याची क्षमता आहे. पण इंग्लंड माझ्यासाठी प्रबळ दावेदार असतील.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: दक्षिण आफ्रिकेला धक्का; डेल स्टेन विश्वचषकातून बाहेर, या खेळाडूला मिळाली संधी
–या दिग्गज फुटबॉलपटूने भारताची जर्सी घालून कर्णधार कोहलीला दिल्या विश्वचषकासाठी खास शुभेच्छा
–विश्वचषक २०१९: किंग कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हे दोन मोठे पराक्रम करण्याची सुवर्णसंधी