आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषकातील ८वा सामना होणार असुन भारतीय संघाचा पहिलाच सामना आहे. हा सामना भारतीय संघासाठी आपले विजयी अभियान सुरु करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे तर इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध सपाटून मार खाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेसाठी विजयाच्या मार्गावर परतण्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे.
या विश्वचषकात सर्वाधिक चर्चा होत असलेला संघ म्हणजेच टीम इंडिया. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचे सध्या सतत चाहते, विश्लेषक आणि समालोचकांकडून विश्लेषण केले जात आहे. त्यामुळे भारताच्या सर्वच खेळाडूंवर यावेळी लक्ष असणार आहे.
या सर्वात भारतीय संघाचा स्टार कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजी, कॅप्टन्सी तसेच फलंदाजीतील विक्रमांकडे तमाम भारतीयांबरोबर जगाचे लक्ष लागले आहे.
विराटलाही या विश्वचषकात अनेक विक्रम करण्याची संधी मिळणार आहे. त्यातील काही निवडक विक्रम-
-वनडे विराटला ११ हजार धावा करण्यासाठी केवळ १५७ धावांची गरज आहे. त्याने या १५७ धावा केल्या तर वनडेत ११ हजार धावा करणारा तो ९वा खेळाडू ठरेल. यापुर्वी भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडूलकर आणि सौरव गांगुली यांनी हा कारनामा केला आहे.
-विराटने आजच्या सामन्यात जर ४७ धावा केल्या तर तो वनडे सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये राहुल द्रविडला मागे टाकत ९व्या स्थानी विराजमान होईल. द्रविडने ३४४ सामन्यात १०८८९ धावा केल्या आहेत तर विराटने २२७ सामन्यात १०८८४ धावा केल्या आहेत.
-विराटला वनडे ५० अर्धशतके करण्यासाठी केवळ एका अर्धशतकाची गरज. जर त्याने अशी कामगिरी केली तर वनडेत ५० अर्धशतके करणारा तो २६ वा खेळाडू ठरेल.
-जर विराटने आज शतकी खेळी केली तर वनडे सर्वाधिक शतकी खेळी करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि विराटमधील शतकांचे अंतर कमी होऊन ७ होईल. सचिनने वनडे ४९ तर विराटने ४१ शतके केली आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–ऑस्ट्रेलियाचा हा दिग्गज गोलंदाज म्हणतो, धोनी भारतासाठी महत्त्वाचा घटक…
–विश्वचषक २०१९: दक्षिण आफ्रिकेला धक्का; डेल स्टेन विश्वचषकातून बाहेर, या खेळाडूला मिळाली संधी
–या दिग्गज फुटबॉलपटूने भारताची जर्सी घालून कर्णधार कोहलीला दिल्या विश्वचषकासाठी खास शुभेच्छा