fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या ५ वेळी भारतीय खेळाडू नडले परदेशी खेळाडूंना, कधी कधी तर मैदानातच…

May 13, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

क्रिकेटला जेंटलमन म्हणजे सभ्य खेळाडूंचा खेळ असे म्हटले जाते. पण क्रिकेट हा देखील एक खेळच असल्याने त्यात २ प्रतिस्पर्धी संघ तसेच खेळाडूंमध्ये स्पर्धा पहायला मिळते. अनेकदा तर खेळाडू एकमेकांना स्लेजिंग करतानाही दिसतात.

स्लेजिंग करुन प्रतिस्पर्धी खेळाडूचे लक्ष विचलित करण्याचा यामागे हेतू असतो. यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड संघातील खेळाडू आघाडीवर आहेत. तसेच सध्याचे भारतीय खेळाडूही यात आता मागे नाहीत. तेही जशास तसे उत्तर देणे पसंत करतात. पण असे असले तरी याआधीच्या काळातही काही भारतीय खेळाडूंनीही अनेकदा स्लेजिंग केली असल्याचे किस्से क्रिकेट चाहत्यांनी ऐकली असतील.

पण अनेक वेळा प्रतिस्पर्धी खेळाडूचा किंवा संघाचा अपमान करणारे किंवा कोणतेही अपमानास्पद वक्तव्य एखाद्या खेळाडूने केल्यास आयसीसी त्यावर कारवाईदेखील करते. 

या लेखात अशा घटनांचा आढावा घेतला ज्यात प्रतिस्पर्धी खेळाडूला स्लेजिंग करण्यात भारतीय खेळाडू सामील होते.

५. २००७ टी२० विश्वचषक – युवराज सिंग विरुद्ध अँड्र्यू फ्लिंटॉफ –

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग त्याच्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. युवराज म्हटलं की प्रत्येकाला पहिल्यांदा आठवतात ते त्याने २००७ च्या टी२० विश्वचषकात स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर मारलेले ६ सलग षटकार. पण हे षटकार मारण्याआधी त्याच्यात आणि इंग्लंडच्या अँड्र्यू फ्लिंटॉफमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. त्यावेळी पंचांना मधे पडावे लागले होते. याबद्दल अजूनही चर्चा होते.

काही दिवसांपूर्वीच युवराजने फ्लिंटॉफ त्याला त्या सामन्यात काय म्हणाला होता याचा खूलासा केला आहे. त्याने सांगितले की त्याने फ्लिंटॉफच्या षटकात २ चौकार मारल्याचे त्याला आवडले नसल्याने षटक संपल्यानंतर फ्लिंटॉफने त्या चौकारांना खराब म्हटले होते. तसेच फ्लिंटॉफने त्याला गळा कापेल अशी धमकीही दिली होती.

त्यावेळी युवराजने त्याला म्हटले होते की त्याच्या हातात बॅट आहे आणि तो त्याला कुठेही मारु शकतो. तसेच त्याचवेळी युवराजने ठरवले की आक्रमक खेळायचे. अखेर युवराजच्या रागाचा बळी ब्रॉड ठरला. त्याच्या गोलंदाजीवर युवराजने ६ चेंडू ६ षटकार मारत इतिहास घडवला.

#OnThisDay in 2007…@YUVSTRONG12 v @StuartBroad8.

6️⃣,6️⃣,6️⃣,6️⃣,6️⃣,6️⃣ 😲

Six sixes in an over, and the fastest ever T20I fifty, off just 12 balls! 🔥 pic.twitter.com/xYylxlJ1b6

— ICC (@ICC) September 19, 2018

४. २००७ टी२० विश्वचषक – रॉबिन उथप्पा आणि मॅथ्यू हेडन –

यष्टीरक्षक फलंदाज रॉबिन उथप्पा तसा भारतीय संघात खूप काळ टिकू शकला नाही. पण तो २००७ च्या टी२० विश्वचषकामुळे सर्वांच्या लक्षात राहिला. पाकिस्तानविरुद्ध सामना बरोबरीत सुटल्यानंतर बॉल आऊट दरम्यान स्टंपवरील बेल्स उडवणाऱ्या भारतीय खेळाडूंपैकी तो एक होता. पण याशिवाय याच विश्वचषकात त्याच्यात आणि मॅथ्यू हेडनमध्येही थोडी शाब्दिक वादावादी झाली होती. ज्याची बरीच चर्चा झाली.

या विश्वचषकातील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या सामन्यात उथप्पा फलंदाजी करत असताना हेडनने त्याला स्लेजिंग केले होते. त्यामुळे जेव्हा हेडन फलंदाजीला आला त्यावेळी उथप्पाने गंभीरपणे हेडनकडे पाहिले. त्यावेळी हेडनने त्याला म्हटले की ‘मी ११ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे त्यामुळे माझा थोडा आदर कर.’ यावर त्यावेळी युवा असलेल्या उथप्पाने त्याला उत्तर दिले होते की ‘आदर दिला जात नाही तो मिळवावा लागतो.’

३. २००८ ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, कसोटी मालिका – हरभजन सिंग आणि अँड्र्यू सायमंड्स 

२००८ ला भारताने केलेला ऑस्ट्रेलिया दौरा हरभजन सिंग आणि अँड्र्यू सायमंड्स यांच्यातील वादामुळे गाजला होता. सिडनी येथे झालेल्या कसोटी सामन्यात सायंमड्सने हरभजनवर त्याला मंकी म्हटल्याचा आणि वर्णभेद केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे दोघांमधील मंकीगेट प्रकरण चिघळले होते.

त्यासामन्यात हरभजन सचिन तेंडुलकरसह फलंदाजी करत होता. त्यावेळी सायमंड्स करत असलेल्या स्लेजिंगला हरभजननेही उत्तर दिले होते. त्यावेळी हरभजनने मंकी म्हटले असल्याचा आरोप सायमंड्सने केला होता. यामुळे हरभजनवर ३ सामन्यांची बंदी देखील घालण्यात आली होती. सायमंड्सच्या बाजूने रिकी पाँटिंग आणि मॅथ्यू हेडन यांनी साक्ष दिली. तर हरभजनकडून सचिनने साक्ष दिली होती. तसेच भारतीय खेळाडूंनीही बीसीसीआयच्या मदतीने हरभजनच्या बंदीविरुद्ध नाराजी व्यक्त केली. त्यामुळे अखेर ही बंदी नंतर उठवण्यात आली होती.

२. २०१८-१९ ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, कसोटी मालिका – टिम पेन आणि विराट कोहली 

२०१८-१९ ला भारताने केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिका भारताच्या चांगल्या कामगिरीबरोबरच स्टंप माईकमधून येणाऱ्या खेळाडूंच्या आवाजासाठी गाजली होती. या मालिकेतील पर्थ कसोटीत विराट कोहली आणि टिम पेन या दोन कर्णधारांमध्ये शाब्दिक चकमक घडली होती. याची चर्चाही बरीच झाली. तसेच त्यांच्यातील या स्लेजिंगचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

या कसोटी दरम्यान तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या षटकात ही शाब्दिक चकमक पहिल्यांदा पहायला मिळाली होती. त्यावेळी त्या सामन्यात पहिल्या डावात १२३ धावांवर बाद झालेला विराट ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सतत काहीतरी बोलत होता. तिसऱ्या दिवशी शेवटच्या षटकात भारतीय संघाने जेव्हा पेनचा मागे झेल गेल्याचे अपील केले तेव्हा विराट म्हणाला ‘जर त्याने गोंधळ घातला तर मालिका 2-0 अशी होईल.’ विराटचे हे वाक्य स्टंप माइकमधून सर्वांना ऐकू आले.

त्याच्या या वाक्यावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पेननेही माघार न घेता विराटला प्रतिउत्तर दिले, ‘त्यासाठी तूम्हाला पहिल्यांदा फलंदाजी करायला पाहिजे.’

ही गोष्ट तिथेच न थांबता चौथ्या दिवशीही त्याचे पडसाद पहायला मिळाले. चौथ्या दिवशी फलंदाजी करत असलेला पेन कोहलीला म्हणाला, ‘काल तू हरवला होतास, आज शांत रहायचा प्रयत्न कर.’ पण त्याचवेळी मैदानावरील पंच ख्रिस गॅफेनी यांनी त्यांना मधेच आडवत ‘आता हे बसं झाले’ असे बजावले.

परंतू यावर पेन म्हणाला, ‘आम्हाला बोलण्याची परवानगी आहे.’ त्यानंतर पुन्हा गॅफेनी यांनी समजावयचा प्रयत्न करताना ते म्हणाले, ‘खेळ खेळा. तूम्ही कर्णधार आहात. टीम तू संघाचा कर्णधार आहेस.’ मात्र यानंतरही पेन कोहलीला म्हणाला, ‘विराट, शांत रहा.’ त्याच्या या वाक्यावर विराट फक्त हसला.

यानंतर काही वेळानंतर पुन्हा एकदा कोहली आणि पेन एकमेकांसमोर आले होते. जेव्हा पेन एक धाव घेण्यासाठी धावत होता तेव्हा कोहली त्याच्या समोर आला. त्यावेळी ते एकमेकांच्या समोर अगदी जवळ उभे होते. यामुळे पेनने कोहलीची तक्रार पंचाकडे केली. तसेच कोहलीही स्केअर लेगला उभे असणारे पंच कुमार धर्मसेना यांच्याबरोबर चर्चा करताना दिसून आला.

१. २०१८-१९ ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, कसोटी मालिका – टिम पेन आणि रिषभ पंत

२०१८-१९ ला भारतीय संघाने केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेदरम्यान भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनमध्येही चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले होते. पंत आणि पेन यांच्यातील संवाद स्टंप माईकमधून ऐकू आला होता.

त्यावेळी पेनने पंतला स्लेजिंग करताना त्याच्या मुलांना सांभाळशील का असेही विचारले होते. पेनने केलेल्या स्लेजिंगचा हिशोब चुकता करतना नंतर पंत यष्टीमागून फलंदाजी करणाऱ्या पेनला डिवचताना दिसला होता.

“कमऑन बाॅईज, आपल्याकडे एक खास पाहुणा आला आहे. तो काही करत नाही. मयांक तुला तात्काळ कर्णधार माहीत आहे का?  पेनची ही खास उपस्थिती आहे. त्याला विशेष काही करता येत नाही. तो फक्त बडबड करतो. ” असे यावेळी पंत म्हणताना दिसला होता.

It was Rishabh Pant's turn for some fun on the stump mic today… #AUSvIND pic.twitter.com/RS8I6kI55f

— cricket.com.au (@cricketcomau) December 29, 2018

ट्रेंडिंग लेख –

रोहितच्या २६४ धावांचा विक्रम मोडण्याची क्षमता असलेले ५ खेळाडू

खूप जास्त अपेक्षा असताना भ्रमनिरास केलेले ७ क्रिकेटपटू

ड्रेसिंग रुममध्ये मला मारणार होते रिचर्ड्स, पाय पकडून मागितली माफी


Previous Post

स्मिथ की विराट? असा प्रश्न जेव्हा विराटचा खास मित्र एबीला विचारला जातो, तेव्हा एबी म्हणतो…

Next Post

जास्तीत जास्त ४ चेंडू, त्यापेक्षा जास्त स्मिथ माझ्यापुढे टिकणं कठीण

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

कर्णधारपद सांभाळण्यासाठी रिषभ पंत घेतोय दिल्ली संघातील ‘या’ खेळाडूंची मदत

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

IPL2021: पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची वादळी अर्धशतके; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय

April 10, 2021
Next Post

जास्तीत जास्त ४ चेंडू, त्यापेक्षा जास्त स्मिथ माझ्यापुढे टिकणं कठीण

एकेवेळी भारताचा कॅप्टन कूल असलेल्या धोनीच्या घरी मात्र 'ही व्यक्ती' धोनीचंच ऐकत नाही

न सांगता संघाबाहेर काढलेला खेळाडू म्हणतो, सचिनबरोबर फलंदाजी करणे म्हणजे...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.