भारतात क्रिकेट हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. जगात क्रिकेटला सर्वाधिक लोकप्रियता भारतात मिळाली आहे. त्यामुळे अनेक ब्रँड किंवा कंपनी भारतात क्रिकेटमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात.
अनेकदा कंपनी मैदानात होर्डिंग्स लाऊन, सामन्यांच्या वेळेत टीव्हीवरी जाहिराातीतून, खेळाडूंच्या जर्सीवर लोगो आणि नाव टाकून त्यांच्या ब्रँड्सची जाहिरात करत असतात. यामध्ये बॅट स्पॉर्नरशीप देखील ब्रँडची जाहीरात करण्याची एक चांगली कल्पना आहे.
सातत्याने मोठ्या धावा करणारे फलंदाज अनेक मोठ्या कपंन्यांच लक्ष वेधून घेतात. या कंपन्या त्या फलंदाजांच्या बॅटवर त्यांच्या ब्रँडचे स्टिकर लावण्यासाठी मोठी रक्कमही मोजतात. कारण फलंदाजांच्या बॅटच्या स्टिकरची चर्चा अनेकदा होत असते. त्यामुळे फलंदाजांच्या बॅटला लावलेल्या स्टिकर्समधून कपंन्यांच्या ब्रँड्सची मोठी जाहीरात होत असते.
या लेखात भारतीय फलंदाजांनी त्यांच्या बॅटवर लावलेल्या स्टिकर्समुळे लोकप्रिय झालेल्या 5 ब्रँडचा आढावा घेण्यात आला आहे. (5 memorable sponsors of bats for the Indian cricket team)
१. एमआरएफ (MRF) –
एमआरएफचे स्टिकर असणारी बॅट म्हटलं की पहिल्यांदा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर समोर येतो. त्याने त्याच्या बॅटवर एमआरएफचे स्टिकर लावलेले असायचे. त्याच्याबरोबरच स्टिव्ह वॉ, ब्रायन लारा, एबी डिविलियर्स अशा खेळाडूंच्या बॅटलाही एमआरएफचे स्टिकर लावलेले असायचे. तसेच आता विराट कोहली, पृथ्वी शॉ, संजू सॅमसन हे या कंपनीचे स्टिकर त्यांच्या बॅटवर लावतात.
एमआरएफ या खेळाडूंना त्यांचे स्टिकर बॅटला लावण्यासाठी मोठी रक्कम देतात. विराटने २०१७ मध्येच एमआरएफबरोबर त्याच्या कराराचे नुतनीकरण केले होते. यावेळी त्याने ८ वर्षांसाठी १०० कोटींचा करार केला आहे. त्याआधी त्याने ३ वर्षांसाठी ८ कोटीचा करार केलेला होता.
एमआरएफचे पूर्ण नाव मद्रास रबर फॅक्टरी असे आहे. एमआरएफ ही टायर बनवणारी भारतातील सर्वात मोठी आणि जगातील चौथ्या क्रमांकाची कंपनी आहे. या कंपनीच्या स्टिकर्सवर ‘जिनियस’ म्हणजेच अलौकिक असे लिहिलेले आहे. त्यांच्या स्टिकरमधील हा शब्द दोन गोष्टींचा अर्थ दर्शवितो – फलंदाज जो एमआरएफ बॅट वापरत आहे तो अलौकिक आहे आणि दुसरा अर्थ म्हणजे, एमआरएफ त्यांच्या कामात कुशल आहेत.
२. ब्रिटानिया (Britannia) –
ब्रिटानिया ही कपंनी भारतात खाद्यपदार्थांचे उत्पादक म्हणून विशेषत: बिस्किट उत्पादक म्हणून प्रसिद्ध आहे. ९० च्या दशकात बॅट स्पॉर्नरशीप ही नवीन कल्पना होती. पण तरीही ब्रिटानियाने यात उडी घेतली.
त्यांनी राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली आणि व्हिव्हिएस लक्ष्मण सारख्या दिग्गज फलंदाजांशी त्यांनी करार केले होते. त्यामुळे ब्रिटानियाला मोठी प्रसिद्धीही मिळाली.
पण मागील काही वर्षांपासून ब्रिटानियाने बॅट स्पॉर्नरशीप करणे बंद केले आहे. पण बॅट स्पॉर्नरशीप करणाऱ्या सुरुवातीच्या काही मोठ्या कंपन्यांमध्ये ब्रिटानियाचेही नाव घेतले जाते.
३. हिरो होंडा (Hero Honda) –
हिरो होंडाचे स्टिकर असणाऱ्या बॅट म्हटले की विरेंद्र सेहवाची आक्रमक फलंदाजी, युवराज सिंगचे ६ चेंडूतील ६ षटकार, सौरव गांगुलीचे ऑफ साईडला मारलेले चौकार-षटकार आठवतात. या सर्वांनी त्यांच्या बॅटवर हिरो होंडाचे स्टिकर्स अनेक वर्षे लावले.
या खेळाडूंची धावा करण्याची गती पाहून मोटारसायलचे उत्पादन करणारी हिरो होंडा कंपनी प्रभावित झाली होती. कारण मोटारसायकलसाठी गती ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे हिरो होंडाने या खेळाडूंबरोबर करारही केला होता.
सेहवाग, गांगुलीचा ब्रिटानियाबरोबरचा करार संपल्यानंतर हिरो होंडाने त्यांच्याशी करार केला होता. हिरो होंडा ही हिरो आणि होंडा या दोन कंपन्यांची संयुक्त मालकी असलेली कंपनी होती. तिचे २०१० मध्ये विभाजन झाल्यावर या कंपनीचे नाव हिरो मोटोकॉर्प असे झाले. त्यामुळे सेहवागने जेव्हा वनडेत वेस्ट इंडिज विरुद्ध द्विशतक केले होते. तेव्हा त्याच्या बॅटवर हिरो मोटोकॉर्पचे स्टिकर होते.
४. रिबॉक (Reebok) –
पादत्राणे (फुटवेअर) आणि कपड्यांचे उत्पादनात अग्रगण्य असणाऱ्या कपंन्यांमधील रिबॉक ही एक कंपनी आहे. काही वर्षांपूर्वी युवा भारतीय क्रिकेटपटूंशी या कंपनीने बॅट स्पॉन्सरशीपसाठी करार केला होता. तसेच त्यातील काही क्रिकेटपटू त्यांचे ब्रँड अँबेसिडर देखील होते.
रीबॉकने स्पॉन्सर केलेल्या मुख्य खेळाडूंपैकी एमएस धोनी, गौतम गंभीर हे खेळाडू होते. धोनी, गंभीर यांनी अनेक वर्षे रिबॉकचे स्टिकर बॅटला लावून क्रिकेट खेळले आहे. त्यांच्याशिवाय रॉबिन उथप्पा, रोहित शर्मा यांनी देखील रिबॉकशी करार केलेला होता. पण ते नंतर या करारातून बाहेर पडले.
५. एसएस (SS)-
एसएस म्हणून ओळखले जाणारे सरीन स्पोर्ट्स जगातील सर्वात मोठे क्रिकेट साधने उत्पादक म्हणून ओळखले जातात. या कंपनीचे मुख्यालय मेरठ, उत्तरप्रदेश येथे आहे. ही कंपनी १९६९ मध्ये स्थापन झाली. तसेच क्रिकेट साधनांचे उत्पादन करणाऱ्या जून्या कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे.
त्यांनीही काही क्रिकेटपटूंबरोबर बॅट स्पॉन्सरशीपसाठी करार केला आहे. यातील सर्वात आधीचे किंवा प्रसिद्ध नाव म्हणजे व्हीव्हीएस लक्ष्मण. त्याने २००१ ला कोलकाता येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध राहुल द्रविडबरोबर दिवसभर भागीदारी करताना २८१ धावांची खेळी एसएसचे स्टिकर लावलेल्या बॅटने केली होती.
एसएसचे स्टिकर लावलेली बॅट लक्ष्मण बरोबरच धोनी, कुमार संगकारा, किरॉन पोलार्ड या क्रिकेटपटूंनी वापरली.
ट्रेंडिंग घडामोडी –
काही लोकांना झेलणं अवघडं आहे, त्यांच्याबरोबर बसायलाही भिती वाटते
केदार म्हणतो, या दोन दिग्गजांमुळे बदलली माझी गोलंदाजीची शैली
गरीब मुलांच्या मदतीला धावुन आला केएल राहुल, करणार ही मदत