fbpx
Wednesday, January 27, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुटपूंज्या किंमत मिळूनही ‘हे’ ५ खेळाडू ठरले आयपीएलमध्ये सुपर डुपर हिट

5 Players Who Got Base Prize In Ipl Instead They Performed Well

August 31, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ IPL & Lionsdenkxip

Photo Courtesy: Twitter/ IPL & Lionsdenkxip


क्रिकेट क्षेत्रात २००८ साली एका नव्या टूर्नामेंटने एंट्री केली, ही टूर्नामेंट म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल). २० षटकांच्या या लीगमध्ये खेळाडूंना मिळणारा चिक्कार पैसा आणि प्रसिद्धी यामुळे आयपीएलमध्ये खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. म्हणून जगभरातील मोठमोठ्या क्रिकेट संघातील दिग्गजदेखील आयपीएलमध्ये खेळताना दिसतात.

दरवर्षी आयपीएल खेळाडूंचा लिलाव होतो. या लिलावात काही शानदार खेळाडूंना फ्रंचायझी विक्रमतोड रक्कमेला आपल्या संघात सामाविष्ट करतात. तर, काही खेळाडूंना एकदम बेसिक किंमतीत संघात सामाविष्ट केले जाते. पण, आयपीएलच्या इतिहासात डोकावून पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते, ती अशी की, जेव्हा जेव्हा खेळाडूंना खूप महागड्या किंमतीत संघात स्थान दिले जाते. तेव्हा तेव्हा ते खेळाडू दमदार प्रदर्शन दाखवण्यात अपयशी ठरतात.

या लेखात, ५ खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांना बेसिक प्राइजमध्ये संघात सामाविष्ट केले गेले, तरीही त्यांनी शानदार प्रदर्शन केले. 5 Players Who Got Base Prize In Ipl Instead They Performed Well

ऍरॉन फिंच – गुजरात लायन्स 

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ऍरॉन फिंच याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वात खतरनाक फलंदाज समजले जाते. फिंचला त्याच्या दमदार प्रदर्शनानंतरही आयपीएलच्या एका संघात कायमचे स्थान मिळाले नाही. आयपीएल २०१६ला त्याची गुजरात लायन्स संघात निवड झाली होती.

त्यावेळी संघाने त्याला १ कोटी रुपयांच्या बेसिक किंमतीत विकत घेतले होते. त्यानंतर पुढील १०व्या हंगामातही तो गुजरात लायन्स संघाचाच भाग होता. दरम्यान त्याने २६ सामने खेळत ६९२ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ७ अर्धशतकांचा समावेश होता. त्याच्या या दमदार प्रदर्शनानंतरही त्याला संघातून बाहेर करण्यात आले होते. त्यानंतर २०१८मध्ये त्याला किंग्स इलेव्हन पंजाबने आपल्या संघात विकत घेतले होते.

आयपीएलच्या तेराव्या हंगामात तो विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग आहे.

हाशिम अमला – किंग्स इलेव्हन पंजाब 

दक्षिण आफ्रिकाच्या महान फलंदाजांपैकी एक हाशिम अमला याने आयपीएलमध्ये जास्त सामने खेळले नाहीत. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत फक्त १६ सामने खेळले आहेत.

२०१६ साली त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाब संघाने त्याला रिप्लेसमेंट खेळाडूच्या रुपात बेस रक्कमेला संघात विकत घेतले होते. पण, पंजाब संघासाठी त्यांचा हा निर्णय खूप फायदेशीर ठरला. अमलाने २०१६ ते २०१७ दरम्यान पंजाबकडून १६ सामने खेळले. त्यात त्याने २ शतके आणि ३ अर्धशतके ठोकत ५७७ धावा केल्या. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये एकही सामना खेळला नाही.

श्रेयस गोपाल – राजस्थान रॉयल्स 

आयपीएलमध्ये भारतीय देशांतर्गत क्रिकेट संघातील अनेक स्टार खेळाडू त्यांची कमाल दाखवताना दिसतात. यात समावेश होतो कर्नाटकच्या अष्टपैलू खेळाडू श्रेयस गोपालचा. २०१४साली आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या या खेळाडूला २०१८मध्ये राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात सामाविष्ट केले होते. त्यावेळी त्यांनी गोपालला केवळ २० लाख रुपयांना आपल्या संघात विकत घेतले होते.

एवढ्या कमी किंमतीत संघात स्थान मिळाल्यानंतरही गोपालने संघासाठी शानदार प्रदर्शन केले होते. तो २०१८ आणि २०१९ या दोन्ही हंगामात राजस्थान संघाचा भाग होता. दरम्यान त्याने २५ सामने खेळत ३१ विकेट्स चटकावण्याचा कारनामा केला होता. यंदाही तो आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना दिसेल.

लसिथ मलिंगा – मुंबई इंडियन्स 

श्रीलंकाचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हा गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलचा भाग आहे. या ३७ वर्षीय गोलंदाजाने २०१८मध्ये आयपीएलमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता आणि तो मुंबई इंडियन्स संघाचा गोलंदाजी मार्गदर्शक बनला होता. पण, लगेच एका वर्षानंतर म्हणजे २०१९मध्ये मलिंगाने पुन्हा आयपीएल खेळायचे ठरवले.

परंतु, आयपीएल २०१९ सालच्या खेळाडू लिलावात त्याला कोणत्याच संघाने विकत घेतले नाही. म्हणून अखेर मुंबई इंडियन्सने त्याला बेसिक किंमतीत आपल्या संघात स्थान दिले.  मलिंगानेही पूर्ण हंगामात दमदार प्रदर्शन करत संघाला ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पूर्ण हंगामात त्याने १२ सामने खेळत १६ विकेट्स आपल्या खात्यात नोंदवल्या.

इमरान ताहिर – चेन्नई सुपर किंग्स 

दक्षिण आफ्रिकाचा दमदार फिरकीपटू इमरान ताहिर हा आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून दमदार कामगिरी करताना दिसेल. ताहिरला सीएसकेने आयपीएलच्या ११व्या हंगामात १ कोटीच्या बेसिक रक्कमेला विकत घेतले होते. पण, हा गोलंदाज कमी किंमतीत संघात सामील होऊनही प्रदर्शनात मागे राहिला नाही.

ताहिरने आतापर्यंत सीएसकेकडून २३ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ३२ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. यंदाही तो सीएसकेकडून दमदार प्रदर्शन करताना दिसेल.

ट्रेंडिंग लेख –

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

-वाढदिवस विशेष- भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

-आयपीएल २०२० मधून बाहेर पडलेल्या रैनाच्या जागी लागू शकते या खेळाडूंची सीएसकेमध्ये वर्णी

महत्त्वाच्या बातम्या –

-विश्वविजेता कर्णधार होणार थेट विरोधी पक्षाचा अध्यक्ष, सत्ताधाऱ्यांना आलं टेन्शन

-एवढ्या संकटमय परिस्थितीतही सीएसकेचा कॅप्टन आहे ‘कूल’, म्हणतोय कोरोनाची प्रकरणे वाढली तरी…

-बीसीसीआयला खेळाडूंच्या आरोग्यापेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा; सोशल मीडियावर चाहत्यांची टीका


Previous Post

सीएसकेला सोडून रैना परतला भारतात, परंतू धोनी मात्र आला चाहत्यांच्या निशाण्यावर

Next Post

क्रीडा क्षेत्रातून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना श्रद्धांजली; विराट, रोहितसह या खेळाडूंचे भावनिक ट्विट

Related Posts

Photo Courtesy: Twitter
क्रिकेट

“भारताविरुद्ध सलामी करणार का?,” डीकवेल्लाचा डॉम सिब्लीला प्रश्न, पाहा मजेशीर व्हिडिओ

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI & ICC
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

गावसकर यांनी केला खुलासा, भारताच्या मालिका विजयानंतर ब्रायन लारा मला मिठी मारत म्हणाले…

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

रिषभ पंत प्रत्येक मालिकेनंतर किट बॅग देतो ज्यूनियर क्रिकेटरला, त्यामागे ‘हे’ आहे खास कारण

January 27, 2021
Photo Curtsey: Facebook/Indian Cricket Team
क्रिकेट

भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना चेन्नईला पोहचल्यानंतर ‘इतक्या’ दिवस रहावे लागणार क्वारंटाईन

January 27, 2021
क्रिकेट

अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असूनही दुर्लक्षित राहिलेला मुंबईकर खेळाडू : रामनाथ पारकर

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ऑस्ट्रेलियाने आगामी टी२० मालिकेसाठी केली १८ सदस्यीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळालीय संधी

January 27, 2021
Next Post

क्रीडा क्षेत्रातून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना श्रद्धांजली; विराट, रोहितसह या खेळाडूंचे भावनिक ट्विट

Photo Courtesy: Facebook/TheChennaiSuperKings

आमचा एक वॉट्सऍप ग्रुप आहे, त्यातूनच मला.... सीएसकेच्या स्टार खेळाडूचा मोठा खुलासा

Photo Courtesy: Twitter/ ICC

इंग्लंड विरुद्ध अर्धशतक झळकावलेल्या बाबर आझमने केली विराट-फिंचच्या विश्वविक्रमाची बरोबरी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.