दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्स याला ‘मिस्टर 360’ म्हणून संबोधले जाते. डिविलियर्स मैदानात सर्व दिशेला फटके खेळतो. म्हणून त्याला ‘मिस्टर 360’ म्हटले जाते. पण डिविलियर्स केवळ क्रिकेटच्या मैदानातच नाही तर त्याच्या संपूर्ण जीवनातच 360 डिग्री कामगिरी करतो हे मात्र काहींना अद्यापही माहीत नाही. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा स्टार फलंदाज एबी डिविलियर्सने शुक्रवारी (३० ऑक्टोबर) नवीन गाणे रिलीज केले आहे. डिविलियर्सचे हे नवे गाणे सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
खेळाव्यतिरिक्त डिविलियर्सला संगीताविषयी विशेष आवड आहे. तो उत्तम गिटारही वाजवतो आणि तितकेच छान गायनही करतो.
एबी डिविलियर्सचं नवीन गाणं
डिविलियर्सने या आधीही २०१० साली संपूर्ण अल्बम रिलीज केला होता. डिविलियर्सच्या आताच्या नवीन गाण्याचे शीर्षक ‘द फ्लेम’ आहे. जे मानवतेबद्दल संदेश देणारे आहे. या गाण्यात त्याच्याबरोबर गायक आणि गीतकार करीन जॉयड आणि युथ कॉयर आहेत. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये डिविलियर्ससोबत आरसीबीचा कर्णधार विराट कोहली, युजवेंद्र चहल, डेल स्टेन यांच्यासह कागिसो रबाडा, ख्रिस मॉरिस आणि एनरीक नोरकिया यांचा समावेश आहे.
डिविलियर्सने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “मी हे गाणे केरण आणि कोयर यांच्यासमवेत एकत्र लिहिले आहे. आम्ही सर्व एकमेकांपासून भिन्न आहोत. पण आम्ही एकत्र मिळून एक परिपूर्ण चित्र उभे करतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
-काय सांगता! एबी डिविलियर्सची ‘या’ प्रसिद्ध टी२० लीगमधून माघार
-गौतम गंभीर म्हणतो, एबी डिविलियर्स प्रमाणेच हा खेळाडूही आहे ‘मिस्टर ३६०’
-IPL 2020: १६ गुण मिळवूनही प्ले ऑफमध्ये मिळणार नाही संधी?, पाहा काय आहे समीकरण
ट्रेंडिंग लेख-
-सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार
-…आणि १५ वर्षांपूर्वी ‘त्या’ खेळीने धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला
-IPL 2020 – धोनीच्या ‘या’ पाच पठ्ठ्यांनी कोलकाताच्या सेनेला दाखवले आस्मान





