इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदने आताच्या खेळाडूंचा मिळून आपला विश्व एकादश संघ तयार केला आहे. रशीदने त्याच्या संघात फक्त २ भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे. ते खेळाडू म्हणजे भारताचा कर्णधार विराट कोहली आणि हिटमॅन रोहित शर्मा हे आहेत. Adil Rasid World Xi Team.
तसेच त्याने आपल्या संघातील ३ खेळाडूंना आपल्या विश्व एकादश संघात स्थान दिले आहे. तर, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाचे प्रत्येकी २ खेळाडू आणि पाकिस्तान व न्यूझीलंड संघातील प्रत्येकी एका खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले आहे.
रशीदने सलामीला फलंदाजी करण्यासाठी रोहितची निवड केली आहे. तर, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नर हा दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. शिवाय, त्याने विराटला तिसऱ्या आणि पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी निवडले आहे.
विशेष म्हणजे, रशीदने विराट संघात असतानाही आपल्या संघाचे नेतृत्वपद इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार ऑयन मॉर्गन याच्याकडे सोपवले आहे. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने २०१९सालचे वनडे विश्वचषक जिंकले होते. त्यामुळे रशीदने मॉर्गनला ५व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी निवडले आहे.
तर, यष्टीरक्षणाची जबाबदारी इंग्लंडचा दमदार यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरवर सोपवली आहे. तसेच, संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून रशीदने इंग्लंडचा बेन स्टोक्सला निवडले आहे. वेगवान गोलंदाजीसाठी रशीदने ऑस्ट्रेलिया संघाचा मिचेल स्टार्क, न्यूझीलंड संघाचा ट्रेंट बोल्ट आणि दक्षिण आफ्रिका संघाचा कागिसो रबाडा यांना निवडले आहे. तर, संघात दक्षिण आफ्रिकाच्या इमरान ताहिरला एकमेव फिरकीपटू म्हणून सामाविष्ट केले आहे.
परंतु, रशीदने ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला सामाविष्ट न करता सर्वांना चकित केले आहे.
असा आहे आदिल रशीदचा विश्व एकादश संघ
रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, विराट कोहली, बाबर आझम, इयान मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षण), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, कागिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, इमरान ताहिर
ट्रेंडिंग घडामोडी-
हसीन जहाॅंने शेअर केला व्हिडीओ, चाहते म्हणतात पती शमी व मुलीची तरी लाज…
अखेर ती एक ट्राॅफी जिंकल्यावर क्रिकेटजगताने इंग्लंडची थांबवली होती…
६० दिवसांनी कोहली दिसला मैदानावर, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल