मुंबई । कोरोना विषाणूच्या सावटात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नुकतेच पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियासह बर्याच देशांमध्ये खेळाडू मैदानावर सराव करण्यासाठी परतत आहेत. यासह क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनेही मैदानात परतण्याची तयारी केली आहे.
मैदानावर पुनरागमणासाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिका इतिहासातील सर्वात अनोखा सामना आयोजित करणार असून त्याला सोलिडॅरिटीकप असे नाव देण्यात आले आहे. माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला (18 जुलै) यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सामना होणार असून या सामन्यात 2 नव्हे तर 3 संघ भाग घेतील.
तथापि, हा सामना आयोजित करण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाचा स्फोट झाला आहे. सॉलिडेरिटी कपच्या एका सामन्यात भाग घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या बर्याच मोठ्या खेळाडूंनी नावे दिली आहेत, परंतु सामन्यापूर्वी खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि स्थळ कर्मचार्यांच्या कोरोना चाचणी करण्यात आली. यात 6 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पण्ण झाले आहेत.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या माहितीनुसार, 10 ते 13 जुलै दरम्यान खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांची विविध ठिकाणी कोरोना चाचणी घेण्यात आली, त्यातील 6 प्रकरणे पॉझिटिव्ह आढळली. पण चांगली गोष्ट म्हणजे सॉलिडेरिटी कप सामन्यात सहभागी होणारा कोणताही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही.
या सामन्यासाठी एबी डिव्हिलियर्स, क्विंटन डिकॉक आणि कॅगिसो रबाडा यांच्या नेतृत्वात 3 संघ तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक संघात 8 खेळाडू असतील. सामन्यादरम्यान 36-36 षटके गोलंदाजी केली जातील.
कागिसो रबाडाच्या संघात रीजा हेन्रिक्झ, जनेमान मालन, फाफ डुप्लेसिस, हेनरिक क्लॅसन, ग्लेनटन स्टरमॅन आणि तबरेज शमसी यांचा समावेश आहे, तर क्विंटन डी कॉकच्या संघात टेंबा बावुमा, जे जे स्मट्स, डेव्हिड मिलर, ड्वेन पेट्रायस, लुथो सिंपला, बुरेन हेन्ड्रिक्स आणि एन्रीच नोर्जे यांचा समावेश आहे.
तिसर्या आणि शेवटच्या संघाचे कर्णधारपद एबी डिव्हिलियर्सच्या ताब्यात देण्यात आले आहे, त्याच्या संघात एडेन मार्करम, रॅकी व्हॅनडर्ड्युसेन, काइल वर्नाईन, अँडिले फेहलूक्वायो, सिसंदा मंगला, ज्युनियर डाला आणि लुंगी एन्गिडी यांचा समावेश आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
त्यांना दुसरे सुनील गावसकर म्हटले जायचे, पण केवळ ३७ कसोटी सामन्यानंतर संपली कारकीर्द
विराटचा खास मित्र होणार तिसऱ्यांदा बाप; अनुष्काने दिल्या शुभेच्छा!
ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजाची पत्नी करतेय न्यायालयात सर्वांची बोलती बंद