आयपीएलचा 13 वा हंगाम संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळला जात आहे. भारतीय क्रिकेट संघ आयपीएलच्या या हंगामानंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. 10 नोव्हेंबरला होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर काही दिवसातच भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर रवाना होईल. बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला या दौऱ्यात काही बदल करण्याची विनंती केली होती आणि ऑस्ट्रेलिया बोर्डाने ही विनंती मान्य केली आहे. बीसीसीआयने केलेली विनंती मान्य केल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ऍलन बॉर्डरने नाराजी व्यक्त केली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या या कसोटी मालिकेचा तिसरा कसोटी सामना सामान्यत: नवीन वर्षानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सिडनीमध्ये सुरू होणार होता.परंतु बीसीसीआयने दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात 7 दिवसांचे अंतर ठेवण्याची विनंती केली होती. त्यामुळे सध्या हा सामना 7 जानेवारी रोजी निश्चित करण्यात आला आहे. अॅलन बॉर्डर यामुळे नाराज आहेत.
ऑस्ट्रेलियामधील मालिकेचा पहिला कसोटी सामना पारंपारिकपणे ब्रिस्बेनमध्ये खेळला जातो. मात्र या दौर्यातील पहिला कसोटी सामना ऍडिलेडमध्ये खेळला जाईल. यामुळेही ऍलन बॉर्डर नाराज आहेत.
फॉक्स न्यूज चॅनेल च्या प्रतिनिधीशी बोलताना ऍलन बॉर्डर यांनी सांगितले की, “मला वाटत नाही की ऑस्ट्रेलिया बोर्डाने वेळापत्रकात तडजोड करायला पाहिजे होती. कोरोना विषाणूमुळे जगभर जे काही घडत आहे त्यामुळे बदल केले असतील तर काही हरकत नाही. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान 7 दिवसांचे अंतर ठेवण्याची बीसीसीआयची मागणी निरर्थक आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्ही बऱ्याच वर्षांपासून सतत सामने खेळत आहोत. ख्रिसमस आणि नवीन वर्ष याच्यादरम्यान होणाऱ्या सामन्यात 7 दिवसांचे अंतर आहे हे ऐकून आश्चर्य वाटल. फक्त बीसीसीआयच्या विनंतीवरून हे बदल करण्यात आले आहे, ही बाब मला पटली नाही.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘आम्ही संघाचे उत्तम संयोजन केले, म्हणूनच..’ KKR च्या प्रशिक्षकाने सांगितले कुलदीपला वगळण्याचे कारण
फ्रेंच ओपन २०२०: श्वार्टझमनला पराभूत करून नदालचा फायनलमध्ये प्रवेश, जोकोविचशी होणार अंतिम लढत
IPL 2020: राजस्थान विरुद्ध दिल्ली सामन्यानंतरची जाणून घ्या ‘ही’ खास आकडेवारी
ट्रेंडिंग लेख –
शेन वॉर्नने त्याला म्हटले होते भारताचा मोठा स्टार; पण ‘तो’ अचानकच झाला आयपीएलमधून गायब आणि आता…
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला