---Advertisement---

अनिल कुंबळेनी ‘मंकीगेट’ प्रकरणावर केले मोठे भाष्य; म्हणाला…

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने २००८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान झालेल्या मंकीगेट प्रकरणाबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्या दौर्‍यावर कर्णधार म्हणून काही कठोर निर्णय घ्यावे लागले असे अनिल कुंबळे यांनी सांगितले. त्यावेळी अशी चर्चा होती की भारतीय संघ दौरा अर्धवट सोडून भारतात परतू शकला असता.

अनिल कुंबळेनी आर अश्विनच्या यू-ट्यूब शो ‘डीआरएस विथ अ‍ॅश’ या शो दरम्यान सांगितले की ऑस्ट्रेलियाचा दौरा भारतासाठी खूप कठीण दौरा होता. सिडनी कसोटीनंतर एक अतिशय कठीण परिस्थिती उद्भवली होती पण संघातील वरिष्ठ खेळाडूंनी अर्ध्यावर दौरा रद्द केला नाही. त्यांचा असे वाटत होते, की हा दौरा अर्धवट सोडल्यास चाहत्यांना चुकीचा संदेश मिळेल.’

अनिल कुंबळे म्हणाला की, ‘कर्णधार म्हणून मला वाटले की या सर्व गोष्टी असूनही जर सिडनी कसोटी सामना अनिर्णीत झाला असता तर तो आमच्यासाठी सर्वोत्कृष्ट निकाल ठरला असता. परंतु तसे घडले नाही आणि आम्ही शेवटची ५ मिनिटे शिल्लक असताना सामना गमावला. शेवटच्या क्षणी मायकेल क्लार्कने ३ विकेट घेतल्या आणि आम्ही तो सामना गमावला.’

अनिल कुंबळे पुढे म्हणाला की, ‘या सर्व गोष्टी घडल्यानंतर कर्णधार म्हणून तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्या टिप्पणीसाठी आमच्या एका खेळाडूवरही बंदी घालण्यात आली पण आम्हाला त्याच्याविरूद्ध अपील करायचे होते. कारण माझा विश्वास आहे की आमचे खेळाडू चुकले असले तरीही आम्हाला एक संघ म्हणून एकत्र रहावे लागेल. पण त्यानंतर बर्‍याच चर्चा सुरू झाल्या की भारतीय संघाला हा दौरा अर्धवट सोडून परत यायचं आहे.’

जर आम्ही हा दौरा रद्द केला असता तर लोकांना आमचीच चूक आहे असे वाटले असते- अनिल कुंबळे

अनिल कुंबळे म्हणाला की, ‘जर आम्ही दौरा रद्द करून परत आलो असतो तर लोकांनी कदाचित असा विचार केला असता की चूक आमची आहे, म्हणूनच आम्ही परत आलो नाही. एक कर्णधार आणि संघ म्हणून आम्ही मालिका जिंकण्यासाठी गेलो. दुर्दैवाने तसे झाले नाही. माझ्या संघात बरेच वरिष्ठ खेळाडू होते .माझे भाग्य की आम्ही सर्वांनी मिळून दौरा रद्द न करण्याचा निर्णय घेतला.’

२००८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान हरभजन सिंगवर एंड्र्यू साइमंड्सविरूद्ध वांशिक भाष्य केल्याचा आरोप झाला होता. याशिवाय त्या दौर्‍यावर पंचांनी भारताविरूद्ध ज्या पद्धतीने निर्णय दिले त्याविषयी बरेच वादविवाद झाले.

महत्त्वाच्या बातम्या – 

वेस्ट इंडीज संकटात; या देशाने दौरा केला रद्द

२०११च्या विश्वचषकादरम्यान आशिष नेहराला शाहिद आफ्रिदी आणि शोएब अख्तरने केली होती ‘ही’ मदत

‘भारताला विश्वचषक जिंकून देऊनच निवृत्त होणार’, पहा कोण म्हणतंय

ट्रेंडिंग लेख –

वाढदिवस विशेष : आपले रक्त देऊन भारतीय कर्णधाराचा जीव वाचवणारा वेस्ट इंडिजचा दिलदार दिग्गज

या ५ गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात टाकले आहेत सर्वाधिक डॉट बॉल

आयपीएल २०२० ठरु शकतो या ५ खेळाडूंचा शेवटचा आयपीएल हंगाम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---