बुमराहने कमालच केली! अर्धशतक ठोकल्यानंतर मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’, Video जोरदार व्हायरल

Australia A vs India 2nd Practice Match Jasprit Bumrah Gets Gaurd of Honour After Scoring

ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध भारत अ संघातील दुसऱ्या सराव सामन्याला शुक्रवारपासून (११ डिसेंबर) सिडनी येथे सुरुवात झाली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार अजिंक्य रहाणेने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाच्या पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल या खेळाडूंशिवाय इतर कोणालाही दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही. परंतु वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने नाबाद अर्धशतकी खेळी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी भारतीय खेळाडूंकडून त्याचा सन्मान करण्यात आला.

सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या पहिल्या डावात भारताकडून बुमराहने ५७ चंडूंचा सामना करत ५५ धावा केल्या. यामध्ये २ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश आहे. या डावात भारतासाठी केवळ बुमराहनेच सर्वाधिक धावा केल्या आहेत.

बुमराहच्या अर्धशतकामुळे भारतीय संघाने सर्वबाद १९४ धावा केल्या. डावाच्या समाप्तीनंतर जेव्हा ड्रेसिंग रूमकडे जाऊ लागला, तेव्हा तिथे बसलेल्या खेळाडूंनी आणि स्टाफने त्याला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला.

https://twitter.com/sachingold17/status/1337344375819419649

बुमराहच्या कारकिर्दीतील हे पहिले प्रथम श्रेणी अर्धशतक आहे. भारतीय वेगवान गोलंदाजाच्या या डावानंतर सोशल मीडियावर त्याची खूप प्रशंसा केली जात आहे.

https://twitter.com/krishanofficial/status/1337348634719875073

https://twitter.com/Ajoanto6/status/1337348307643813889

बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेतील भाग नव्हता. या दौऱ्यावर चेंडूने कमाल करू न शकणाऱ्या बुमराहने अर्धशतक ठोकल्यामुळे चाहते खुश झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvsAUS: दुसऱ्या सराव सामन्यात विराट- पुजारा यांच्या अनुपस्थितीमुळे भारताची अवस्था ‘दयनीय’

ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत वाढ! दुसऱ्या सराव सामन्यातून मोझेस हेन्रीक्स बाहेर; ‘या’ खेळाडूचा संघात समावेश

टी२० विश्वचषकात ‘या’ खेळाडूने करावे भारतीय संघाचे नेतृत्त्व; पार्थिव पटेलने मांडले मत

ट्रेंडिंग लेख-

शंभर शतके ठोकणाऱ्या सचिनला आवडतात स्वतःच्या ‘या’ तीन खेळ्या; दुसरी आहे खूपच खास

शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ

अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.