न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विलियमसन आज (८ ऑगस्ट) 32वा वाढदिवस आहे. त्याने आतंरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला 2010 साली भारताविरुद्ध दमदार सुरूवात केली होती. आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात विलियम्सने 131 धावांची खेळी केली होती. आता केन विलियम्सन क्रिकेट विश्वातील मोठे नाव बनले आहे.
जगात फॅब-4 म्हणून ओळखले जाणाऱ्या विराट कोहली, स्टीव स्मिथ, जो रुट यांच्याबरोबर केन विलियमसन (Kane Williamson) याचे नावही आदराने घेतले जाते.
आजपर्यंत न्यूझीलंड संघाकडून अनेक फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिेकेट गाजवले आहे. मात्र केन विलियमसन सारखे त्यांना फॅब-4 मध्ये स्थान मिळवता आले नव्हते.
केन विलियमसन बद्दलच्या खास गोष्टी-
– आजच्या अनेक यशस्वी क्रिकेटपटूंप्रमाणे विलियमसननेही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरमुळे क्रिकेट खेळायला सुरवात केली.
-क्रिकेट सोबतच केन विलियमसनला रग्बी आणि बॉस्केटबॉल हे खेळही तितकेच आवडतात. त्याने एका शालेय बास्केटबॉल स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला आहे.
-केन विलियमसन, ट्रेंट बोल्ट आणि डग ब्रेसवेल हे न्यूझीलंड संघाकडून खेळणारे क्रिकेटपटू लहानपणी शेजारी राहत होते. हे तिघे आजही चांगले मित्र आहेत.
-केन विलियम्सनला लोगन नावाचा जुळा भाऊ आहे. लोगनच्या जन्माआधी काही मिनिटे केन जन्मला आहे. या दोघांमध्ये कायम चांगले बॉन्डिंग राहिले आहे.
-केन विलियमसनचे संपूर्ण कुटूंब क्रीडाप्रेमी आहे. त्याच्या मोठ्या बहिणी व्हॉलीबॉलच्या उत्कृष्ट खेळाडू आहेत.
– केन विलियमसनने वयाच्या 17 व्या वर्षी 2008 मध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात न्यूझीलंड संघाचे नेतृत्व केले होते. या विश्वचषकातील उपांत्यफेरीत न्यूझीलंडला विराट कोहली कर्णधार असलेल्या भारतीय संघाकडून पराभव स्विकारावा लागला होता.
-केन विलियमसनच्या नेतृत्त्वाखाली न्यूझीलंड संघाने पहिलेवहिले आयसीसी कसोटी चँपियनशीप जेतेपद पटकावले आहे.
– फॅब-4 फलंदाजांमध्ये स्थान मिळवलेल्या केन विलियमसनने गोलंदाजी करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 72 विकेट्स मिळवल्या आहेत.
केन विलियमसनची आतंरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द-
केन विलियमसनने 88 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 52.62 च्या सरासरीने 7368 धावा केल्या आहेत. यात 24 शतके आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे.
न्यूझीलंडकडून खेळलेल्या 151 एकदिवसीय सामन्यात विलियमसनने 47.48 च्या सरासरीने 6174 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 13 शतके आणि 39 अर्धशतके झळकावली आहेत.
केन विलियमसनने 74 टी-20 सामन्यात 14 अर्धशतकाच्या सहाय्याने 2021 धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! दिग्गज भारतीय अष्टपैलू क्रिकेटर झाला नेपाळ टीमचा कोच
ऑस्ट्रेलियाची पुन्हा सरशी! हॉकी फायनलमध्ये भारताचा ७-० ने दारूण पराभव
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी साधली सुवर्ण हॅट्ट्रीक! सात्विक-चिराग जोडीने जिंकले गोल्ड






