---Advertisement---

मोठी बातमी! दिग्गज भारतीय अष्टपैलू क्रिकेटर झाला नेपाळ टीमचा कोच

On: सोमवार, ऑगस्ट 8, 2022 7:27 PM
---Advertisement---

भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू मनोज प्रभाकर यांची नेपाळ क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुबुदु दासानायके यांनी नेपाळच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला. आता प्रभाकर यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे.

पुबुदु दासानायके (Pubudu Dassanayake) यांनी कॅनडा संघाचे मुख्य प्रशिक्षकद स्वीकारण्यासाठी नेपाळ संघाची साथ सोडल्याचे समोर आले आहे.  मनोज प्रभाकर (Manoj Prabhakar) भारतीय संघाचे माजी दिग्गज अष्टपैलू आहेत. भारतासाठी त्यांनी एकूण १६९ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. खेळाडूच्या रूपात कारकीर्द मोठी केल्यानंतर त्यांनी प्रशिक्षकाच्या रूपात देखील स्वतःला सिद्ध केले. प्रभाकर यांना आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये तीन रणजी संघांच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील प्रशिक्षकपद भूषवले आहे. २०१६ साली ते अफगाणिस्तान संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते.

प्रभाकर यांच्या नियुक्तीची पुष्टी करताना नेपाळच्या क्रिकेट असोसिएशनने सांगितले की, “भारतीय संघाचे माजी स्टार अष्टपैलू आणि रणजी ट्रॉफी विजेते प्रशिक्षक श्री, मनोज प्रभाकर यांची नेपाळच्या राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली गेली आहे”

“प्रभाकर यांनी ३९ कसोटी सामने आणि १३० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रशिक्षकाच्या भूमिकेत त्यांनी अफगाणिस्तान संघासोबतच रणजी संघ दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनसोबत काम केले आहे.”

नेपाळ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त झाल्यानंतर प्रभाकर म्हणाले की, “नेपाळमधील क्रिकेविषयीची आवड, प्रतिभा आणि गुणवत्ता पाहून मी नेपाळ क्रिकेट संघासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे, जेणेकरून त्यांना एक क्रिकेट शक्ती म्हणून ओळख मिळेल.”

दरम्यान, नेपाळ क्रिकेट संघासाठी प्रभाकर यांची नियुक्त खूपच महत्वाची आहे. प्रभाकर यांच्यावर देखील काही महत्वाच्या जबाबदाऱ्या असणार आहेत. नेपाळ क्रिकेट संघ मागच्या काही काळापासून अडचणांचा सामना करत आहे. यावर्षी खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी देखील त्यांना क्लालिफाय करता आले नाहीये.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

ऑस्ट्रेलियाची पुन्हा सरशी! हॉकी फायनलमध्ये भारताचा ७-० ने दारूण पराभव

CWG 2022: अचंता शरथची टेबल टेनिसमध्ये भन्नाट कामगिरी! भारताला जिंकून दिले २२वे सुवर्ण

Breaking: भारताच्या ‘सेन’नं गाठलं ‘लक्ष्य’! अंतिम सामन्यात विजय मिळवत घेतलंय सुवर्णपदक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---