मुंबई । किंग्ज इलेव्हन पंजाब हा आयपीएलमधील एक महत्त्वपूर्ण संघ आहे. ज्याचा इतिहास विशेष असा नाही. बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाच्या पंजाब संघाला एकदासुद्धा आयपीएलच्या विजेतेपदावर आपले नाव कोरता आले नाही. आयपीएलच्या इतिहासात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने एकदा आयपीएल 2014 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. मात्र, आयपीएल 2020 मध्ये पंजाबचा संघ विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मैदानात उतरेल.
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून किंग्ज इलेव्हन पंजाबने बर्याच खेळाडूंना आपल्या संघाचा कर्णधार बनवले आहे, परंतु कोणत्याही कर्णधाराला पंजाबला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही.
आर अश्विन हा गेल्या 2 हंगामात पंजाब संघाचे नेतृत्व करीत होता. परंतु लिलावापूर्वी पंजाबने अश्विनची साथ सोडली. यामुळे आता आयपीएल 2020 मध्ये पंजाब नवीन कर्णधारसह मैदानात उतरेल.
केएल राहुलला आयपीएल 2020 साठी पंजाबने आपल्या संघाचा नवा कर्णधार म्हणून नेमले आहे. त्याचबरोबर पंजाबच्या संघानेही आपला मुख्य प्रशिक्षक नियुक्त केला आहे. त्यांनी माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू ब्रॅड हॉगने आपल्या यूट्यूब चॅनलवर पंजाबचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहणार असल्याचे भाकीत केले होते.
तो म्हणाला होता, “किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये खूप चांगले परदेशी खेळाडू आहेत. यात काही मॅच विनरही आहेत. पण त्यांना सातत्यपूर्ण कामगिरी करता येत नाही. मुजीब उर रहमान आणि ख्रिस जॉर्डन वगळता सर्वजण मॅच विनर आहेत. या दोन खेळाडूंचा रोल निश्चित असतो. ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस गेल आणि जिमी निशम सातत्यपूर्ण कामगिरी करू शकत नाहीत. परदेशी खेळाडूंच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या अभावामुळे कदाचित किंग्ज इलेव्हन पंजाब या हंगामात तळाशी राहील ”
आईपीएल 2020 मधील किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ-
केएल राहुल (कर्णधार), निकोलस पूरन, प्रभसिमरन सिंह, ख्रिस गेल, मनदीप सिंह, ग्लेन मैक्सवेल, मयंक अग्रवाल, सरफराज खान, करुण नायर, दीपक हुड्डा, हार्डस विलोजेन, के गौथम, दर्शन नाल्कांडे, हरप्रीत बरार, जेम्स नीशम, ख्रिस जॉर्डन, रवि बिश्नोई, तजिंदर सिंह ढिल्लन, मुरुगन अश्विन, मुजीब उर रहमान, जगदीश सूचित, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, शेल्डन कॉटरेल, इशान पोरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केले केकेआरच्या फिरकीपटूचे कौतुक म्हणतो, ‘त्याला खूप आत्मविश्वास आहे’
-डरना मना है! ‘आयपीएलमध्ये खेळणारे क्रिकेटर्स नाही घाबरणार कोरोना व्हायरसला’
ट्रेंडिंग लेख-
-या ३ कारणांमुळे आयपीएल २०२० चॅम्पियन बनणार किंग्ज इलेव्हन पंजाब संघ?
-अजूनही आयपीएल खेळत असते तर, हे ५ परदेशी खेळाडू झाले असते सुपर डुपर हिट
-मुछे हो तो नत्थूलाल जैसी अन् क्रिकेटर असावा तर लालाजींसारखा