मुंबई । यावर्षी 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये आयपीएल खेळवली जाणार आहे. कोरोनाव्हायरसमुळे 29 मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा यापूर्वी तहकूब करण्यात आली होती. यानंतर, आयसीसीने ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी 20 विश्वचषक पुढे ढकलताच बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. सर्व संघ 13 व्या हंगामात जिंकण्यासाठी उत्सुक आहेत.
भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या टीम आरसीबीला एकदा देखील आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीने अलीकडे कोहलीला जिंकण्यासाठी काय करावे लागेल याविषयी सांगितले आहे.
स्टार स्पोर्ट्स शो ‘क्रिकेट कनेक्ट’ मध्ये ब्रेट ली म्हणाला, ‘विराट कोहली मैदानावर जाऊन क्रिकेटचा आनंद घ्यावा अशी माझी फार इच्छा आहे. कर्णधार आणि खेळाडू म्हणून सर्व दबाव दूर करणे हे विराटसाठी महत्वाचे आहे. विराट कोहली शानदार खेळाडू आहे, परंतु मला असे वाटते की कधीकधी संघात सर्वत्र दबाव वाढतो तेव्हा लोक अपयशी होऊ लागतात. तो स्वत: संपूर्ण टीमचा बोजा घेण्याचा प्रयत्न करतो. आरसीबी संघाने कोहलीचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”
विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला आतापर्यंत एकदाही आयपीएल विजेतेपद मिळवता आले नाही. आतापर्यंत आरसीबीने एक वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, परंतु संघ विजेतेपद मिळविण्यात अपयशी ठरला. 2016 मध्ये या संघाने अंतिम फेरी गाठली होती.
कोहली आरसीबी सोडणार नाही
आता आयपीएल 2020 युएईमध्ये सुरू होणार आहे. युएईच्या परिस्थितीत संघाची कामगिरी चांगली होऊ शकते, कारण फिरकीस पोषक खेळपट्टीवर गोलंदाज विरोधी फलंदाजांना अडचणीत आणून, आरसीबी संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. कोहली सुरुवातीपासूनच या संघाकडून खेळतो. तो खूप भावनिक आहे. त्याने नेहमीच असे म्हटले आहे की या संघाला कधीही सोडायचे नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवणं नाही सोप्पं, नुसते नियम ऐकून तुम्हाला येईल टेन्शन
-झिवाच्या मांडीवरील छोटा मुलगा पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, काहींनी दिल्या धोनीला शुभेच्छा
-विराट कोहली म्हणजे कपडे घातलेला वाघ, संघसहकाऱ्याने केली विराटची थट्टा
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या ५ फलंदाजांमध्ये पहिल्या दोन स्थानावर आहेत परदेशी क्रिकेटर
-आयपीएलमधील सर्वात वयस्कर मोहरे, ज्यांनी वयाला मागे टाकत केले कारनामे
-वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पन्नासपेक्षा अधिक धावा करणारे अव्वल ३ भारतीय फलंदाज